प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ४ लोकांवर कारवाई

By मंगेश व्यवहारे | Published: July 4, 2024 01:53 PM2024-07-04T13:53:54+5:302024-07-04T13:54:26+5:30

Nagpur : एकूण १० प्रकरणांत ६५ हजार रुपयांचा दंड वसुल

Action against 4 people for using restrictive plastic bags | प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या ४ लोकांवर कारवाई

Action against 4 people for using restrictive plastic bags

नागपूर : मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या धंतोली झोन अंतर्गत रिषभ धवले कॉटन मार्केट, गांधीबाग झोन अंतर्गत केशव किराणा सब्जी मंडी ईतवारी, सतरंजीपुरा झोन अंतर्गत पौनीकर किराणा शॉप मस्कासाथ ईतवारी आणि आशीनगर झोन अंतर्गत रवी स्वीट्स कपिलनगर या चार प्रतिष्ठानांवर कारवाई करून २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत शंकरनगर येथील कोलकाता रोल रेस्टारेंटने कचरा टाकुण चेंबर ब्लॉक केल्याने यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कला किड्स फेन्ड्रस कॉलनी काटोल रोड आणि आशीनगर झोन अंतर्गत लिटील अचिव्हर स्कूल आवळेबाबू चौक यांनी परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत स्वाप्निल मेंढे रेशिमबाग, धंतोली झोन अंतर्गत अपॅक्स बिल्डकॉन मनीषनगर आणि मंगळवारी झोन अंतर्गत साईबा एनक्लेव्ह राजाराम सोसायटी झिंगाबाई टाकळी यांनी रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्याने त्यांच्यावर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असे एकूण १० प्रकरणांत ६५ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Web Title: Action against 4 people for using restrictive plastic bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.