नागपुरात ६३ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 10:56 PM2018-11-08T22:56:53+5:302018-11-08T22:59:38+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फटाके लावत रात्री १० वाजतानंतरही फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या एकूण ६३ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सीताबर्डी पोलिसांनी रेल्वेस्थानक मार्गावर लागलेल्या एका फटाके विक्रेत्याकडून ३२ हजारांचे प्रतिबंधित फटाके जप्त करून त्याच्यावर कारवाई केली.

Action against 63 law breakers firecrackers in Nagpur | नागपुरात ६३ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई

नागपुरात ६३ फटाकेबाजांविरुद्ध कारवाई

Next
ठळक मुद्देमध्यरात्रीपर्यंत सुरू होती धूमधडाम : सीताबर्डी पोलिसांनी जप्त केले फटाके

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फटाके लावत रात्री १० वाजतानंतरही फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या एकूण ६३ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सीताबर्डी पोलिसांनी रेल्वेस्थानक मार्गावर लागलेल्या एका फटाके विक्रेत्याकडून ३२ हजारांचे प्रतिबंधित फटाके जप्त करून त्याच्यावर कारवाई केली.
पर्यावरणाचे हित लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने फटाक्याच्या संबंधाने दिशा-निर्देश जारी केले. त्यानुसार, रात्री १० वाजतानंतर फटाके फोडता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रदूषण रोखण्यासाठी मदत करू पाहणाऱ्या या आदेशाचे नागरिकांनी आणि फटाके विक्रेत्यांनी पालन करावे, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनानेही केले. या आदेशाचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई केली जाईल, असा ईशाराही पोलिसांनी दिला होता. मात्र, अनेकांनी त्या आदेश अन् इशाऱ्याला फटाके लावले. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत शहरात फटाक्यांची कर्णकर्कष आतषबाजी सुरू होती. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी सर्व ठाणेदारांना फटाके फोडणारांवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार, बहुतांश पोलीस ठाण्यातील वाहने फटाके फोडणारांचा शोध घेऊ लागले. जरीपटका पोलिसांनी रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्या २२ जणांना ताब्यात घेतले.
सीताबर्डी पोलिसांनी श्रीमोहिनी कॉम्प्लेक्सजवळ मनोज मंगलानी (रा. कामठी) याच्या फटाका सेंटरवर कारवाई केली. तो प्रतिबंधित फटाक्यांची विक्री करीत होता. त्याच्याकडे सुरक्षेसंबंधाच्या कोणत्या उपाययोजनादेखील नव्हत्या. त्यामुळे त्याचे दुकान बंद करण्याची कारवाई करून त्याच्याकडून ३२ हजारांचे फटाके जप्त करण्यात आले. शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 63 law breakers firecrackers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.