अस्वच्छता पसरविण्याच्या प्रकरणात ८० लोकांवर कारवाई
By मंगेश व्यवहारे | Published: November 11, 2023 01:15 PM2023-11-11T13:15:19+5:302023-11-11T13:15:35+5:30
उपद्रव शोधपथकाची धडक कारवाई
नागपूर :नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोधपथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ८० लोकांवर शुक्रवारी कारवाई करून ५८,३०० रुपयाचा दंड वसूल केला.
हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते अशा १५ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याने ४ लोकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी ४ लोकांवर कारवाई करून १६०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल, मंगल कार्यालय, कॅटरस यांनी मोकळ्या जागेवर कचरा टाकल्याने दोघांवर कारवाई करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता अडविल्या प्रकरणात १८ लोकांवर कारवाई करून २८,५०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली. बांधकामाचा मलबा टाकल्याने एकावर कारवाई करून १ हजारांचा दंड वसूल केला.