सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई 

By मंगेश व्यवहारे | Published: February 14, 2024 01:06 PM2024-02-14T13:06:20+5:302024-02-14T13:06:39+5:30

रस्ता फुटपाथवर कचरा टाकल्या प्रकरणी ३ व्यक्तींवर कारवाई केली.

Action against 90 people for spreading uncleanliness in public places in nagpur | सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई 

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ९० लोकांवर कारवाई 

नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां ९० लोकांवर कारवाई करून५३२०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरीकांवर महापालिका दंडात्मक कारवाई करीत असते. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने २८ लोकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ११,२०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली.

रस्ता फुटपाथवर कचरा टाकल्या प्रकरणी ३ व्यक्तींवर कारवाई केली. ९ दुकानदारांनी रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी कारवाई केली. याच प्रकरणात १ उपहारगृहावरही कारवाई केली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान व स्टेज टाकून अडविल्या प्रकरणी ९ लोकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून१४५०० रुपयांची वसुल करण्यात आला. एका मांस विक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली.

Web Title: Action against 90 people for spreading uncleanliness in public places in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर