ब्लॅक फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांविरोधात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:08 AM2020-12-06T04:08:47+5:302020-12-06T04:08:47+5:30
कामठी पोलिसांची मोहीम : ७५ हजार रुपयांचा दंड कामठी : ब्लॅक फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांविरोधात कामठीच्या वाहतूक पोलिसांनी धडक ...
कामठी पोलिसांची मोहीम : ७५ हजार रुपयांचा दंड
कामठी : ब्लॅक फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांविरोधात कामठीच्या वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गत चार दिवसात २५० च्या वर वाहनचालकांविरोधात कारवाई करून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी दिलेल्या आदेशानुसार ब्लॅक फिल्म, फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनांविरोधात, मास्क न लावणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कामठी वाहतूक विभागातील पोलिसांनी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉकी बिल्डिंग, मोटर स्टॅण्ड चौक, जयस्तंभ चौक, पोलीस लाईन परिसरात नियमांचे पालन न करणाऱ्या २५० चारचाकी वाहनचालकांविरोधात कारवाई करून ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सोबतच ज्या वाहनचालकांनी फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर लावली आहे, सोबतच मास्क न लावता वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध कारवाई करीत दंड आकारण्यात आला आहे. या कारवाई पथकात वाहतूक पोलीस निरीक्षक प्रभाकर मत्ते, सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कातुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश ठाकूर, हेडकॉन्स्टेबल पृथ्वीराज रेवडे, शहनाज अख्तर अन्सारी, अविनाश नुन्हारे, प्रफुल्ल तागडे, वैशाली दुरुगकर, रूपेश नानवटकर यांचा समावेश होता.