औषध दुकानांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:05 AM2018-09-04T00:05:37+5:302018-09-04T00:08:28+5:30

गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम उघडली आहे. नागपुरात ही मोहीम सोमवारी सुरू झाली. औषध दुकानांच्या तपासणीची कामे सुरू झाली असून ‘आॅक्सिटोसिन’ची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात दहावर औषध दुकाने दोषी आढळून आल्याची माहिती आहे.

Action against drug shops | औषध दुकानांवर कारवाईचा बडगा

औषध दुकानांवर कारवाईचा बडगा

googlenewsNext
ठळक मुद्देदूधवाढीच्या औषधांची विक्री : एफडीएची तपासणी मोहीम सुरू

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : गाई-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आॅक्सिटोसिन’ औषधाची विक्री करणाऱ्या औषध दुकानांच्याविरोधात रविवारपासून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोहीम उघडली आहे. नागपुरात ही मोहीम सोमवारी सुरू झाली. औषध दुकानांच्या तपासणीची कामे सुरू झाली असून ‘आॅक्सिटोसिन’ची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात दहावर औषध दुकाने दोषी आढळून आल्याची माहिती आहे.
स्तनपानासाठीही ‘आॅक्सिटोसिन’ औषध महत्त्वाचे मानले जाते. प्रसूतीच्या काळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि त्याचा प्रमाणित डोस घेणे आवश्यक असते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराने कर्करोगाची भीती असते. आॅक्सिटोसिनचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शरीरविक्रीच्या रॅकेटमधील दलाल, भाजी व फळांची वेगाने वाढ व्हावी यासाठीही आॅक्सिटोसिनचा वापर वाढत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या. याची दखल घेत मुंबईमध्ये ‘एफडीए’ने तोतया ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय आॅक्सिटोसिनची अवैध विक्री पकडली. दुकानांचे बिलबुकही तपासण्यात आले. हीच मोहीम नागपुरातही सुरू झाली. परंतु रात्री उशिरापर्यंत किती औषध दुकानांवर कारवाई झाली, ही माहिती अधिकाऱ्यांकडे नव्हती. मात्र सूत्रानुसार दहाच्यावर दुकानांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Action against drug shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.