लुबाडणूक करणाऱ्या ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांवर कारवाई : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:18 PM2020-06-16T21:18:29+5:302020-06-16T21:21:08+5:30

ग्रामीण भागातील कर्जदारांची ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून लुबाडणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून अशा प्रकरणांतील ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

Action against fraudulent 'micro finance' companies: Anil Deshmukh | लुबाडणूक करणाऱ्या ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांवर कारवाई : अनिल देशमुख

लुबाडणूक करणाऱ्या ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांवर कारवाई : अनिल देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोना’काळातही सक्तीने कर्जवसुली

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ग्रामीण भागातील कर्जदारांची ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून लुबाडणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून अशा प्रकरणांतील ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
पीडित महिलांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची नागपुरात भेट घेतली. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले. कोरोनाच्या काळात कोणत्याही बँक किंवा अन्य पतपुरवठा करणाºया संस्थांनी कर्जाची वसुली करू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) दिले असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांचे अधिकारी ग्रामीण भागात जाऊन सक्तीने कर्जवसुली करीत आहेत. तसेच कोणताही अधिकार नसताना महिलांच्या घरातील वस्तू जप्त करीत असल्याची तक्रार या महिलांनी केली. हा प्रकार अत्यंत असंवेदनशील असून आरबीआयच्या निर्देशांचे पालन न करणाºया कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. यापुढे ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांनी निर्देशांचे पालन करावे, अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.

महिलांकडून वसुली
‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून अव्वाच्यासव्वा व्याज वसूल केले जात आहे. दर महिन्याला २ ते ४ टक्के व्याजाची वसुली केली जात आहे. हे कोणत्याही नियमात बसत नसून केवळ महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जात आहे, अशी तक्रार महिलांनी गृहमंत्र्यांकडे केली. या महिलांच्या तक्रारींची दखल स्थानिक पोलिसांनी घ्यावी व महिलांना त्रास होणार याची खबरदारी घेण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले.

Web Title: Action against fraudulent 'micro finance' companies: Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.