नागपुरात प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 10:36 PM2020-12-29T22:36:02+5:302020-12-29T22:37:48+5:30

Action against plastic kite, nylon manza seller संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. मंगळवारी चार झोनमध्ये नऊ जणावर कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला.

Action against plastic kite, nylon manza seller in Nagpur | नागपुरात प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

नागपुरात प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. मंगळवारी चार झोनमध्ये नऊ जणावर कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला.

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. धंतोली झोनअंतर्गत १, गांधीबाग ६,सतरंजीपुरा १ आणि आशीनगर झोनअंतर्गत १ कारवाई करण्यात आली. या माध्यमातून ९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. १६४ प्लास्टिक पतंग जप्त करण्यात आल्या.

Web Title: Action against plastic kite, nylon manza seller in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.