देहव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कारवाई
By दयानंद पाईकराव | Published: May 5, 2024 04:17 PM2024-05-05T16:17:22+5:302024-05-05T16:18:27+5:30
पिडीत मुलीची सुटका : मनिषनगरच्या हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये कारवाई
दयानंद पाईकराव, नागपूर : मनिषनगर येथील हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये देहव्यवसाय करवून घेणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी कारवाई करून एका पिडीत मुलीची सुटका केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४.१५ ते रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान घडली.
बेलतरोडी ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांना बेलतरोडी ठाण्याच्या हद्दीत आरोपी आपल्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे आरोपी विशालला त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. आरोपी विशालने हॉटेल अशोका इम्पेरियलमध्ये ३ हजार रुपयात पिडीत मुलीला देहव्यवसायासाठी उपलब्ध करून दिले. पोलिसांनी तेथे धाड टाकून घटनास्थळावरून रोख ३ हजार रुपये रोख व इतर साहित्य असा एकुण ३०३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पिडीत मुलीची पोलिसांनी चौकशी केली असता बंटी नावाच्या आरोपीने आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन विशालसोबत संगणमत करून देहव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे सांगितले. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी विशाल आणि बंटीविरुद्ध कलम ३७०, ३७० (अ), ३४, सहकलम ३, ४, ५, ७ पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे, उपनिरीक्षक मालोकर, अच्युत रिंडे, अनिल गडवे, तेजराम देवळे, रवी आकरे, प्रशांत ठवकर, कुणाल लांडगे यांनी केली.