अग्निशमन व्यवस्था नसलेल्या नागपुरातील  कोचिंग क्लासेसवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:07 PM2019-06-24T22:07:16+5:302019-06-24T22:09:51+5:30

सूरत येथील आगीच्या घटनेतून धडा घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ९६ कोचिंग क्लासेसची तपासणी करून त्यांना अग्निशमन नियमांचे पालन करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, वारंवार निर्देश देऊनही अग्निशमन नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार कोचिंग क्लासेसना सील लावण्यात आले आहे.

Action on coaching classes in Nagpur without fire control system | अग्निशमन व्यवस्था नसलेल्या नागपुरातील  कोचिंग क्लासेसवर कारवाई

अग्निशमन व्यवस्था नसलेल्या नागपुरातील  कोचिंग क्लासेसवर कारवाई

Next
ठळक मुद्देचार क्लासेसना सील : ९६ क्लासेसची तपासणी करून नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूरत येथील आगीच्या घटनेतून धडा घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ९६ कोचिंग क्लासेसची तपासणी करून त्यांना अग्निशमन नियमांचे पालन करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, वारंवार निर्देश देऊनही अग्निशमन नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार कोचिंग क्लासेसना सील लावण्यात आले आहे.
सील लावण्यात आलेल्यांमध्ये नंदनवन येथील स्नेहा ट्युशन क्लासेस, महाल येथील कॅलिबर नोवा क्लासेस, संस्कार अकॅडमी व प्रतापनगर येथील शारदा क्लासेसचा समावेश आहे. सक्करदरा, गंजीपेठ व नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रांनी ही कारवाई केली. यासंदर्भात मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अग्निशमन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला. सील लावण्यात आलेले कोचिंग क्लासेस अग्निशमन विभागाचे निर्देश गांभीर्याने घेत नव्हते. परिणामी, त्यांना सील लावण्यात आले. यापुढेही कारवाई सुरू राहील, असे उचके यांनी सांगितले.
३४ क्लासेस असुरक्षित
अग्निशमन विभागाने निरीक्षण केलेल्या ९६ पैकी ३४ कोचिंग क्लासेसना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. त्यातील ११ क्लासेसचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Action on coaching classes in Nagpur without fire control system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.