अवैध रेती वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:40+5:302020-12-08T04:08:40+5:30
उमरेड : नजीकच्या नवेगाव साधू फाटा परिसरात उमरेडच्या दिशेने येत असलेल्या अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. टिप्पर ...
उमरेड : नजीकच्या नवेगाव साधू फाटा परिसरात उमरेडच्या दिशेने येत असलेल्या अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परवर कारवाई करण्यात आली. टिप्पर चालक-मालक दिनेश किसन खोकले (३५, रा. पोलार, ता. नागपूर) असे आरोपीचे नाव असून, एमएच-४०/बीजी-८३३५ क्रमांकाच्या टिप्परच्या माध्यमातून ही अवैध रेती वाहतूक सुरू होती.
टिप्परमध्ये ३० हजार रुपये किमतीची सहा ब्रास रेती आणि १५ लाख रुपये किमतीचा टिप्पर असा एकूण १५ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
....
रेतीचा अवैध साठा
पवनी येथील वैनगंगेच्या खोऱ्यातून अवैधरीत्या रेतीची उचल सुरूच आहे. काही बड्या असामींना सोबतीला घेत पवनी, भिवापूर आणि उमरेड परिसरात रेतीची अवैधरीत्या साठवणूक करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर फोफावला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. यामागे पाठबळ कुणाचे, यावर खमंग चर्चा सुरू आहे. दुसरीकडे रेतीघाटांचा लिलाव होत नसल्याने हातावर घेऊन प्रपंच चालविणाऱ्या ट्रक चालक-मालक आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचेही विदारक सत्य समोर येत आहे.