नागपूर विद्यापीठाची कारवाई :२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:29 AM2018-06-01T00:29:23+5:302018-06-01T00:29:42+5:30

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

Action of Nagpur University: Prohibits admission in 209 colleges | नागपूर विद्यापीठाची कारवाई :२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

नागपूर विद्यापीठाची कारवाई :२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

Next
ठळक मुद्देनियमित शिक्षक नसल्याने ८२ महाविद्यालयांना धक्का : विद्यार्थ्यांनो सावध व्हा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील ९८ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते. विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. यासंदर्भात २९ महाविद्यालयांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. ८२ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.
मागील वर्षीदेखील लावली होती प्रवेशबंदी
नागपूर विद्यापीठाने या महाविद्यालयांना वारंवार इशारा दिला होता. संबंधित महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मागील वर्षीदेखील अगोदर ७४ व त्यानंतर ४० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती. जर मागील वर्षीच प्रवेशबंदी लावली तर त्यांचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नामांकित महाविद्यालयांचा समावेश
प्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. शिक्षक, कर्मचारी नसल्यामुळे अनेक मोठ्या महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी लावण्यात आली आहे.

Web Title: Action of Nagpur University: Prohibits admission in 209 colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.