कोरोनानंतरचे फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:54+5:302021-05-16T04:08:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने तज्ज्ञ डॉक्टर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून नागपूर, ...

Action plan to prevent post-coronary fungal infections | कोरोनानंतरचे फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी कृती आराखडा

कोरोनानंतरचे फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी कृती आराखडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने तज्ज्ञ डॉक्टर तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून नागपूर, विदर्भात झपाट्याने पसरणारे व कोरोनानंतर होणारे फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी एक कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे.

गडकरी यांनी शनिवारी या संदर्भात एक बैठक बोलाविली होती. त्या बैठकीत हा कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यात फंगल इन्फेक्शन रोखण्यासाठी पावले उचलली जातील. या रोगावर महाग औषधांवर पर्याय, उपचारासाठी सुविधा वाढवणे, यावर या बैठकीत चर्चा झाली.

बैठकीला विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, खा. डॉ. विकास महात्मे प्रामुख्याने उपस्थित होते. ब्लॅक फंगलचा प्रादुर्भाव डोळे, नाक, जबडा, मेंदू, सायनस येथे होत आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या आजाराने नागपुरात शेकडो रुग्णांना ग्रासले आहे. या आजारावर एम्फोटेरिसीन बी, पोसस्कॅनाझोल व isuacuna zole या औषधाचा मुख्यतः उपयोग होतो. या औषधांची मागणी कमी असल्यामुळे ही औषधे बाजारपेठेत कमी उपलब्ध आहेत. १५ दिवसांत या औषधांची मागणी वाढल्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला. राज्यात भारत सिरम कंपनी या औषधांचे उत्पादन करते.

Web Title: Action plan to prevent post-coronary fungal infections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.