बोगस डिग्री प्रकरणात २० डॉक्टरांवर निलंबन कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:17 PM2018-07-12T23:17:06+5:302018-07-12T23:18:07+5:30

५३ डॉक्टारांच्या अतिरिक्त डिग्रीची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. चौकशी सुरू आहे. डिग्री बोगस असेल तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली.

Action for suspension of 20 doctors in bogus degree case | बोगस डिग्री प्रकरणात २० डॉक्टरांवर निलंबन कारवाई

बोगस डिग्री प्रकरणात २० डॉक्टरांवर निलंबन कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देगिरीश महाजन : ५३ बोगस डिग्रीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५३ डॉक्टारांच्या अतिरिक्त डिग्रीची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळून आले आहे. चौकशी सुरू आहे. डिग्री बोगस असेल तर संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल. २० डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य अनंत गाडगीळ यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
या डॉक्टरांच्या अतिरिक्त डिग्रीच्या बोगस प्रमाणपत्राची सुनावणी करण्याची कार्यवाही मेडिकल कौन्सिलकडून सुरू आहे. २०१७ पासून डिग्री तपासण्याचे काम सुरू आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून रुग्णांना मेडिकल रिपोर्ट न पाहता सही करणाऱ्या चार पॅथालॉजिस्ट विरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.
बोगस डिग्री असल्याचे आढळून आलेल्या डॉक्टरांच्या विरोधात ठराविक कालमर्यादेत कारवाई करणार का, असा प्रश्न सदस्य संजय दत्त यांनी केला. २०१७ पासून डिग्री तपासण्याचे काम सुरू असून सुमोटो कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महाजन यांनी दिली. परप्रांतातून आलेल्या डॉक्टरांच्या बोगस डिग्र्री कशा तपासणार, असा सवाल हेमंत टकले यांनी केला. काही जणांनी जातीचे बोगस दाखले घेऊ न डिग्री घेतल्या आहेत. यासंदर्भातही चौकशीच्या सूचना दिल्याची माहिती महाजन यांनी दिली. चर्चेत शरद रणपिसे यांनीही सहभाग घेतला.

Web Title: Action for suspension of 20 doctors in bogus degree case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.