चेन पुलिंग करणाऱ्या १०९० जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:16+5:302021-09-08T04:11:16+5:30

दयानंद पाईकराव नागपूर : संकटकाळात रेल्वेगाडी थांबविण्यासाठी रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये चेन लावलेली असते. आपातकालीन स्थितीत ही चेन ओढून रेल्वेगाडी ...

Action taken against 1090 people for pulling chains | चेन पुलिंग करणाऱ्या १०९० जणांवर कारवाई

चेन पुलिंग करणाऱ्या १०९० जणांवर कारवाई

Next

दयानंद पाईकराव

नागपूर : संकटकाळात रेल्वेगाडी थांबविण्यासाठी रेल्वेगाडीच्या प्रत्येक कोचमध्ये चेन लावलेली असते. आपातकालीन स्थितीत ही चेन ओढून रेल्वेगाडी थांबविता येते; परंतु अनेक प्रवासी विनाकारण क्षुल्लक कारणासाठी ही चेन ओढतात. गेल्या तीन वर्षात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने विनाकारण चेन पुलिंग करणाऱ्या १०९० प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ६ लाख ७६ हजार ८२५ रुपये दंड वसूल केला आहे. तर दंड न भरणाऱ्या ८ जणांना तुरुंगात जाण्याची वेळ आली.

अनेकदा रेल्वेने जाणारे प्रवासी ऐनवेळी रेल्वेस्थानकावर पोहोचतात. घाईगडबडीत काही जण रेल्वेत बसतात तर काही जण प्लॅटफॉर्मवरच राहतात. मग आत चढलेले नातेवाईक चेन ओढून रेल्वेगाडी थांबवितात. अशा वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने रेल्वे ॲक्ट १४१ नुसार कारवाई करण्यात येते. विनाकारण रेल्वेची चेन ओढणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. ठोस कारण असल्याशिवाय रेल्वेची चेन ओढणे चुकीचे आहे; परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्यांना आरपीएफच्या कारवाईला सामोरे जावे लागते. रेल्वे ॲक्ट १४१ नुसार विनाकारण चेन पुलींग करणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा आहे. त्यामुळे क्षुल्लक कारणासाठी चेन पुलींग करीत असाल तर ही शिक्षा भोगण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

...............

तीन वर्षातील कारवाई

वर्ष/ कारवाई / दंड २०१९/ ५७२ / ३८८१९५ २०२०/ २२० / १२९३३० २०२१ (ऑगस्टपर्यंत) २९७ / १५९३०० ही आहेत चेन पुलींगची कारणे

-ऐनवेळी रेल्वेस्थानकावर पोहोचून नातेवाइकांसाठी चेन ओढणे

-खाद्यपदार्थ घेण्यासाठी प्लॅटफॉर्मवर गेलेले नातेवाईक न आल्यामुळे चेन ओढणे

-नव्या डिझाईनच्या कोचमध्ये चेनच्या हँडलला पकडून बर्थवर चढणे

-मोबाइल खाली पडला म्हणून चेन ओढणे

चेन पुलींगमुळे रेल्वेचे नुकसान ‘चेन पुलींग केल्यामुळे रेल्वेचे नुकसान होते. मागून येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडते. रेल्वेगाडी थांबल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी अधिक वीज खर्च होते. चेन पुलींग करणे रेल्वे ॲक्टनुसार गुन्हा आहे. त्यामुळे ठोस कारण असल्याशिवाय चेन पुलींग करणे टाळावे. विनाकारण चेन पुलींग केल्यास दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो.’

-आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, नागपूर.

.............

Web Title: Action taken against 1090 people for pulling chains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.