एकाच दिवशी अस्वच्छता पसरविणाऱ्यां ६३ लोकांवर कारवाई, ४७१०० रुपयांचा दंड वसूल
By मंगेश व्यवहारे | Published: June 20, 2024 03:50 PM2024-06-20T15:50:14+5:302024-06-20T15:50:32+5:30
मंगेश व्यवहारे नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ६३ लोकांवर कारवाई करून ...
मंगेश व्यवहारे
नागपूर : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या, थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ६३ लोकांवर कारवाई करून ४७१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने १८ लोकांवर कारवाई केली असून ७२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर रस्त्यावर कचरा टाकल्याने ९ लोकांवर कारवाई करीत ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दोन दुकानदारांनी रस्त्यावर कचरा टाकल्यामुळे त्यांच्याकडून ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ३ मोठ्या आस्थापनेवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मंडप टाकून रस्ता अडवून धरल्या प्रकरणी ५ लोकांवर कारवाई करून १४ हजार रुपये दंड वसूल केला. हरीत लवाद यांनी दिलेल्याआदेशाप्रमाणे एका मंगल कार्यालयावर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला.
प्रतिबंधित प्लास्टीक पिशवी विक्रेत्यांवर कारवाई
प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या गांधीबाग झोन अंतर्गत गौरीकर किराणा इतवारी यांच्यावर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत आय ॲण्ड रेटिना केअर सेंटर कोतवालनगर यांच्यावर सामान्य कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रशांतनगर वर्धा रोड वर यश इन्फ्रा यांनी बांधकामाचा साहित्य टाकून सिवर लाईन ब्लाक केल्यामुळे ५ हजाराचा दंड वसूल केला गेला. मेंडॉस अपार्टमेंट सुरेंद्रनगर यांच्यांवर कचरा टाकल्या प्रकरणी ५ हजाराचा दंड वसूल केला गेला. धरमपेठ झोन अंतर्गत विजय रेस्टॉरेंट झेंडा चौक यांच्यावर शीळे अन्न टाकणेबाबत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.