९ प्रतिष्ठानांवर कारवाई, ६० हजाराचा दंड वसूल
By मंगेश व्यवहारे | Published: July 8, 2024 07:39 PM2024-07-08T19:39:26+5:302024-07-08T19:39:44+5:30
- अस्वच्छता पसरविणाऱ्या ८१ लोकांवर कारवाई
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पधकाने ९ प्रतिष्ठानावर कारवाई करून ६० हजाराचा दंड वसूल केला. पथकाद्वारे सोमवारी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या दोन प्रतिष्ठानावर कारवाई करून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
यात लकडगंज झोन अंतर्गत मिनीमातानगर येथील अनिल डेअरी व सतरंजीपुरा झोन अंतर्गत मारवाडी चौक येथील धकाते अगरब्बती शॉप यांचा समावेश आहे. याशिवाय लक्ष्मीनगर झोन अंतर्गत राईस असोसिएट्स सुरेंद्रनगर आणि विलास पाटणे रामदासपेठ यांच्याकडून रस्त्यावर कचरा टाकल्या प्रकरणी १० हजार रुपये दंड वसूल केला.
धरमपेठ झोन अंतर्गत देविकर कंस्ट्रक्शन माधवनगर आणि धंतोली झोन अंतर्गत एस. आर. कंस्ट्रक्शन बैद्यनाथ चौक, वेलवेट इन्फ्रा बिल्डर्स नरेंद्रनगर यांनी रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकल्याने त्यांच्यावर कारवाई करून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत गुरुछाया रेसिडेन्सी फेंड्रस कॉलनी काटोल रोड आणि मंगळवारी झोन अंतर्गत माय कम्प्युटर मंगळवारी मार्केट यांनी परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्याने यांच्याकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
- अस्वच्छता पसरविणाऱ्या ८१ लोकांवर कारवाई
पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्या ८१ लोकांवर कारवाई करून ३३ हजार २०० रुपये दंड वसूल केला.