मृत, निवृत्तांची नावे आढळल्यास कारवाई

By admin | Published: December 19, 2014 12:44 AM2014-12-19T00:44:50+5:302014-12-19T00:44:50+5:30

गेल्या काही वर्षात पोलिसांच्या बदल्या व बढत्यांच्या याद्या सदोष राहिल्या आहेत. या यादीत मृत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असायचा. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या

Action taken if the names of deceased, nurses are found | मृत, निवृत्तांची नावे आढळल्यास कारवाई

मृत, निवृत्तांची नावे आढळल्यास कारवाई

Next

महानिरीक्षकांचे आदेश : यापुढे पदोन्नती यादीची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रमुखांवर
यवतमाळ : गेल्या काही वर्षात पोलिसांच्या बदल्या व बढत्यांच्या याद्या सदोष राहिल्या आहेत. या यादीत मृत आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असायचा. यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली जात होती. ही इभ्रत वाचविण्यासाठी आता महासंचालक कार्यालयाने खबरदारी घेतली असून अशा चुका होणार नाही याची जबाबदारी थेट पोलीस प्रमुखांवर टाकली आहे.
सेवानिवृत्त झालेल्या तसेच मृत अधिकाऱ्यांचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश करण्यात आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. ‘लोकमत’नेच महासंचालक कार्यालयाचा हा रामभरोसे कारभार अनेकदा उघड केला आहे.
अशा कारभारामुळे महासंचालक कार्यालयाच्या कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह लावले गेले. परंतु यापुढे अशा चुका होऊ नये म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी १७ डिसेंबर रोजी विशेष आदेश जारी केले आहेत. नि:शस्त्र फौजदारांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर बढती दिली जाणार आहे. यानिमित्ताने संभाव्य याद्यांमधील चुका दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माहितीची संपूर्ण जबाबदारी घटक प्रमुख तथा पोलीस प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. जुन्या चुकांपासून धडा घेत महासंचालक कार्यालयाने हे सुधारणेचे पाऊल उचलले आहे. (प्रितिनिधी)
खास दुतामार्फत माहिती पाठवा
पोलीस अधिकाऱ्याला निलंबन, वेतनवाढ रोखणे किंवा अन्य प्रकारची शिक्षा झाली आहे काय, विभागीय चौकशी-कारवाई सुरू आहे का, त्याचे स्वरूप, कारण, सदर अधिकारी केव्हा सेवानिवृत्त होणार अशी इत्थंभूत माहिती मागविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पदोन्नतीच्या नियोजित यादीतील कुणी अधिकारी सेवानिवृत्त झाला, मरण पावला, स्वेच्छानिवृत्ती अथवा राजीनामा देऊन गेल्यास त्याची माहिती विनाविलंब महासंचालक कार्यालयाला खास दुतामार्फत कळविण्याचे निर्देश पोलीस प्रमुखांना देण्यात आले आहे.

Web Title: Action taken if the names of deceased, nurses are found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.