धूर सोडणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:06+5:302021-09-03T04:08:06+5:30

मनपा आयुक्तांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश : १५ वर्षांहून जुन्या वाहनावर स्क्रॅब पॉलिसी अंतर्गत कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Action will be taken against smoke emitting vehicles () | धूर सोडणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई()

धूर सोडणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई()

googlenewsNext

मनपा आयुक्तांचे परिवहन अधिकाऱ्यांना निर्देश : १५ वर्षांहून जुन्या वाहनावर स्क्रॅब पॉलिसी अंतर्गत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात वायुप्रदूषण नियंत्रण कृती आराखड्याची अंमलबजावणी करून धूर सोडणारे व प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, असे निर्देश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी सर्व वाहनांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) अनिवार्य आहे. यादृष्टीने परिवहन विभागाने वाहनांवर कारवाई करावी. याशिवाय १५ वर्षांहून जुन्या वाहनावर स्क्रॅब पॉलिसी अंतर्गत कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी शहराच्या वायुप्रदूषण नियंत्रणाकरिता स्थापन नागरीस्तरीय कृती समितीच्या बैठकीत परिवहन विभागाला दिले.

उपायुक्त रवींद्र भेलावे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोनाली चव्हाण, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) अजयकुमार मालवीया, शहर परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नायब तहसीलदार स्नेहल ढोके, व्हीएनआयटीचे डॉ. दिलीप लटाये, नीरीच्या पदमा राव, संगीता गोयल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अशोक कारे, आदी उपस्थित होते.

...

नीरीकडून कृती आराखड्याचे सादरीकरण

शहराच्या सुक्ष्म नियोजन कृती आराखड्याचे नीरीद्वारे बैठकीत सादरीकरण करण्यात आले. आराखड्यातील वायुप्रदूषण नियंत्रणासाठी समाविष्ट बाबींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले.

...

वायूप्रदूषण नियंत्रणासाठी प्रकल्प

शहरातील वायुप्रदूषण नियंत्रणाकरिता राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मंजूर प्रकल्पाची अंमलबजावणी आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत नागपूर शहराची वायू गुणवत्ता सुधारण्याकरिता निश्चित केलेल्या प्रस्तावित प्रकल्पांच्या प्रस्तावाच्या मंजुरीची कार्यवाही तातडीने करा, अल्प व मध्यम अवधीचे (शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म) नियोजन करण्याचे निर्देश राधाकृष्णन बी. यांनी दिले.

.....

Web Title: Action will be taken against smoke emitting vehicles ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.