नागपूर : लोकवस्तीलगत आरामशीन असल्यास कारवाई करू, वन विभागाचे संकेत

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 27, 2023 07:20 PM2023-04-27T19:20:59+5:302023-04-27T19:21:25+5:30

धोकादायक आरामशीन शहराबाहेर नेणार.

Action will be taken if the population is unsettled forest department | नागपूर : लोकवस्तीलगत आरामशीन असल्यास कारवाई करू, वन विभागाचे संकेत

नागपूर : लोकवस्तीलगत आरामशीन असल्यास कारवाई करू, वन विभागाचे संकेत

googlenewsNext

नागपूर : आरामशीनमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्यास कारवाईचा अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे. त्याचप्रमाणे वन विभागाचा परवाना नसल्यास आणि धोकादायक आरामशीनची कुणी तक्रार केल्यास निश्चितच कारवाई करणार असल्याचे संकेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भात तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोक्षधाम चौक, पटेल मार्गावरील आरामशीन आता लोकवस्तीत आल्या आहेत. बहुतांश उद्योगांचे बांधकाम जर्जर झाले असून आग विझविण्याची सिस्टिम उपलब्ध नाही. या परिसरात आरामशीन लगत आहेत. शिवाय लोकवस्तीही आहे. आरामशीनमधून उडालेल्या भुश्याचे कण हवेद्वारे वस्तीत जातात. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा आजार होतो. या परिसरातील सर्वच आरामशीनची तपासणी करावी आणि अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून प्रसंगी उद्योग बंद करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

आधी आराममशीन शहराबाहेर होत्या. आता लोकवस्तीत आल्या आहेत. धोकादायक ठरणाऱ्या आरामशीनला शहराबाहेर हलविण्याचा अधिकार वन विभागाला आहे. एमआयडीसी येथील कटारिया अ‍ॅग्रो प्रा.लि.मध्ये घडलेली आगीची जीवघेणी घटना पाहता मनपाचा बांधकाम व अग्निशमन विभाग आणि वनविभाग सतर्क झाला आहे. या तिन्ही विभागाकडून अटी आणि नियमांचे उल्लंघन होत आहे वा नाही, याची तपासणी व चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

याआधी मनपाने तपासणी आणि चौकशी करून २८ आरामशीन असुरक्षित असल्याचा अहवाल दिला होता. त्यातील ५ आरामशीनला बंद करण्याचे आदेश दिले होते. पुढे काय झाले, याची माहिती नाही. त्यानुसार शहरातील आरामशीनची तपासणी तर होईल, पण शहराबाहेर किती आरामशीन स्थलांतरित होतील, यावर संभ्रम आहे. लाकडावर होणाऱ्या प्रक्रियेतून निघणारा भुशा ज्वलनशील असतो. त्यामुळे आरामशीनमध्ये आगीच्या घटना घडतात. हे उद्योग अटी व नियमांचे पालन करतात वा नाही, याकडे संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज आहे.

भीषण आगीच्या घटनेने आरामशीन हा विषय अतिशय संवेदनशीन ठरला आहे. वन विभाग सर्वच आरामशीनच्या परवान्याची तपासणी करणार आहे. कुणी तक्रार केल्यास निश्चितच तपासणी करू. परवाना नसल्यास आरामशीन बंद करू. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मनपाच्या संबंधित विभागानेही तपासणी करावी.
रंगनाथ नाईकडे,
मुख्य वनसंवर्धन अधिकारी.

Web Title: Action will be taken if the population is unsettled forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर