ॲक्टिव्हा दुभाजकावर आदळली, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:41+5:302021-07-17T04:08:41+5:30
बुटीबाेरी : वेगात असलेली ॲक्टिव्हा गतिराेधकावरून उसळली आणि दुभाजकावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ॲक्टिव्हा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
बुटीबाेरी : वेगात असलेली ॲक्टिव्हा गतिराेधकावरून उसळली आणि दुभाजकावर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या ॲक्टिव्हा चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटीबाेरी परिसरात बुधवारी (दि. १४) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
रणजित मगनलाल मेश्राम (३४, रा. कटाेरी, ता. खैरलांजी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. ता.एमएच-४०/बीबी-३१८१ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने व्यंकटेश सिटीच्या दिशेने जात हाेता. दरम्यान, वेगात असलेली ॲक्टिव्हा गतिराेधकावरून उसळली आणि लगतच्या दुभाजकावर आदळली. यात रणजित गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला बुटीबाेरी येथील रुग्णालयात आणले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.