‘सोशल कनेक्ट’ मित्रांच्या मदतीचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ सेतू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 05:01 AM2020-04-08T05:01:06+5:302020-04-08T05:01:19+5:30

फोनवर डॉक्टरांचा सल्ला : ज्येष्ठांना औषध व अन्नदानही; अफवा नियंत्रणाचीही यंत्रणा

The 'Active' bridge to help social connect | ‘सोशल कनेक्ट’ मित्रांच्या मदतीचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ सेतू

‘सोशल कनेक्ट’ मित्रांच्या मदतीचा ‘अ‍ॅक्टिव्ह’ सेतू

Next


निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाला वैद्यकीय सेवेची गरज आहे. कुणाला तातडीने औषध हवे आहे. डॉक्टरांचा सल्ला हवा आहे. कुणी भुकेने व्याकूळ आहेत. जेवणाचा डबा हवा आहे.
‘सोशल’ विचारांचा हा ग्रुप
तातडीने ‘अ‍ॅक्टिव्ह’ होतो अन् मदतीला
धावून जातो. ही सेवा तातडीने दिली
जातेच. शिवाय मदतीनंतर ‘अ‍ॅप्रिसिएट’ही केले जाते.
या मदतीच्या सेतूमुळे संकटाची प्रत्यक्ष झळ पोहचलेल्यांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. सोशल मीडियावर एकीकडे
अफवांचे पेव फुटले असताना
याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेला हा सेतू आदर्श ठरला आहे.
नागपूरच्या काही तरुणांनी असा देशव्यापी ग्रुप तयार करून या माध्यमातून भुकेल्यांना अन्न, आजारी लोकांच्या प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरांची मदत, ज्येष्ठांसाठी औषधांचा पुरवठा आणि गरजवंतांना हवी ती मदत पोहचविण्याचा वसा घेतला आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्या संदेशांची पोलखोल करण्यासाठी खरेतर या ग्रुपची निर्मिती झाल्याचे डॉ. अभिक घोष यांनी सांगितले.
आलेल्या संदेशाला इंटरप्रीट करून त्यातील खरेपणा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू
करण्यात आले. त्यासाठी
माध्यम तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला. पुढे मात्र या कामाची व्याप्ती वाढत गेली.
‘डॉक्टर्स आॅन कॉल’ सेवा
‘डॉक्टर्स आॅन कॉल’ ही सेवा सुरू करण्यात आली. कोणत्याही आजारामध्ये प्राथमिक उपचार मिळेल, यासाठी ग्रुपमध्ये असलेले तरुण डॉक्टर्स मदतीसाठी पोहचू लागले.

कौन्सिलर्सचीही मदत
लोकांची भीती दूर करण्यासाठी ग्रुपमधल्या ५ मानसोपचारतज्ज्ञ आणि २५ कौन्सिलर्सची मदत घेतली जात आहे. औषधोपचार आणि जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्याची सेवाही राबविली आहे. भुकेल्या गरजूंपर्यंत दररोज २०० पॅकेट्स शिजलेले अन्न पोहचविण्याची सेवाही सुरू झाली. ग्रुपमधील जवळपास १८० सदस्यांच्या संपर्कातूनच हे सर्व सेवाकार्य चालले आहे.

पीपीई कीटचे काम सुरू
काही आर्थिक संपन्न व्यक्तींनी या प्रत्येक कामासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या ग्रुपमधील जाणकारांनी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट तयार करण्याचे कामही सुरू केले आहे. अडचणीत फसलेल्या इतर शहरांतील लोकांना त्या त्या शहरातील सदस्यांद्वारे तातडीची मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.

Web Title: The 'Active' bridge to help social connect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.