रेल्वेगाड्यांना जनरल कोच जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:12 AM2020-12-05T04:12:13+5:302020-12-05T04:12:13+5:30
नागपूर : रेल्वेत लॉकडाऊननंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास ...
नागपूर : रेल्वेत लॉकडाऊननंतर रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच या गाड्यांमधून प्रवास करीत आहेत. त्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत असून या गाड्यांना जनरल कोच जोडण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे रेल्वेत सहा महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. केवळ विशेष पार्सल रेल्वेगाड्या आणि कामगारांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू होत्या. हळहळू रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या चालविणे सुरू केले. परंतु या रेल्वेगाड्यांना जनरल कोच जोडण्यात येत नसल्यामुळे गरीब प्रवाशांची गैरसोय होत आहे. जनरल कोचचे तिकीट सर्वात कमी असल्यामुळे जनरल कोचचा प्रवास गरीब प्रवाशांना परवडणारा असतो.
`विशेष रेल्वेगाड्यांमध्ये जनरल कोच जोडण्यात येत नाहीत. त्यामुळे गरीब प्रवाशांना अधिक पैसे मोजून आरक्षित कोचमधून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गरीब प्रवाशांसाठी जनरल कोचची व्यवस्था करणे आवश्यक आहे.`
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र