दोन दिवसात कोरोनाच्या १७ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:40+5:302021-09-21T04:08:40+5:30
नागपूर : रविवार व सोमवार या दोन दिवसात जिल्ह्यामध्ये १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली ...
नागपूर : रविवार व सोमवार या दोन दिवसात जिल्ह्यामध्ये १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून, सद्यस्थितीत ७५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
रविवारी जिल्ह्यात चार जण पॉझिटिव्ह आढळले व सर्व जण शहरातील होते, तर मृत्यूसंख्या शून्य होती. दुसरीकडे सोमवारी १३ नवे रुग्ण आढळले. त्यातील १० शहरातील तर ३ ग्रामीण भागातील होते. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ९३ हजार २०५ इतकी झाली आहे. त्यातील ३ लाख ४० हजार २०४ शहरातील तर १ लाख ४६ हजार १६४ रुग्ण ग्रामीणमधील आहेत. सोमवारी सात रुग्ण बरे झाले व बरे झालेल्यांचा आकडा ४ लाख ८३ हजार १० वर पोहोचला.
सद्यस्थितीत शहरातील ५५, ग्रामीणमधील १७ रुग्ण मिळून एकूण ७५ सक्रिय रुग्ण आहेत.
चाचण्या घटल्या
सोमवारी जिल्ह्यात केवळ २ हजार ५१७ चाचण्या झाल्या. त्यापैकी २ हजार २६९ शहरात तर २१८ ग्रामीण भागात झाल्या. रविवारी हाच आकडा ५ हजार ३८५ इतका होता. दोन दिवसात जिल्ह्यात एकही मृत्यू नोंदविण्यात आला नाही.
:: कोरोनाची सोमवारची स्थिती
दैनिक चाचण्या : २,५१७
शहर : १० रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ३ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण : ४,९३,२०५
एकूण सक्रिय रुग्ण : ७५
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८३,०१०
एकूण मृत्यू : १०,१२०