४०३ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:08 AM2021-01-04T04:08:54+5:302021-01-04T04:08:54+5:30

नागपूर : चाचण्यांची संख्या वाढताच कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झाली. रविवारी ४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा जीव ...

Addition of 403 corona | ४०३ कोरोनाबाधितांची भर

४०३ कोरोनाबाधितांची भर

Next

नागपूर : चाचण्यांची संख्या वाढताच कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झाली. रविवारी ४०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ८ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १२४९५३ झाली असून मृतांची संख्या ३९५९ वर गेली. आज २७५ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९३.६० टक्के झाले आहे. विशेष म्हणजे, १६ दिवसांनंतर रुग्णसंख्या ४००वर गेली. त्यामुळे चिंता वाढली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३२४, ग्रामीण भागातील ७६ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणमधील ३ तर जिल्ह्याबाहेरील २ आहेत. मृतांची संख्या कमी झाली असली तरी बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तीनवेळा दैनंदिन बाधितांची संख्या ५००वर गेली होती नंतर ३०० ते ३५० दरम्यान रुग्णांची नोंद होत होती. परंतु आता मागील चार दिवसांपासून ४०० दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात आज ५०७५ आरटीपीसीआर तर ५७ ७ रॅपिड अँटिजेन असे एकूण ५६५२ चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीत २८ तर आरटीपीसीआर चाचणीत ३७५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ४०३७ रुग्ण उपचार घेत असून १३०३ रुग्ण विविध रुग्णालयांत तर २,७३४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

-शहरातील ९३,४०४ तर, ग्रामीणमधील २३५५३ रुग्ण बरे

कोरोनाचा या १० महिन्यांच्या काळात शहरात ९३,४०४ तर ग्रामीणमधील २३,५५३ असे एकूण १,१६,९५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८,९८८, तर ग्रामीणमध्ये २५,१७२ झाली आहे. सध्या मेडिकलमध्ये १५५, मेयोमध्ये ९० तर एम्समध्ये ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयात ४८ तासांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची स्थिती

-संशयित रुग्ण-५,६५२

एकूण रुग्ण-१,२४,९५३

-बरे झालेले रुग्ण -१,१६,९५७

उपचार घेत असलेले रुग्ण-४,०३७

मृत्यू संख्या-३,९५९

Web Title: Addition of 403 corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.