कोरोनाबाधितांमध्ये ४१८ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:53+5:302020-12-16T04:26:53+5:30
नागपूर : सोमवारी ३०० च्या खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ४१८ वर पोहचली. चाचण्यांचा संख्येतही ६ हजाराने वाढ झाली. ...
नागपूर : सोमवारी ३०० च्या खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ४१८ वर पोहचली. चाचण्यांचा संख्येतही ६ हजाराने वाढ झाली. आज ९ रुग्णांचा जीव गेला. बाधितांची एकूण संख्या ११७९११ तर मृतांची संख्या ३८१३ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कमी, ३७४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९१.८७ टक्क्यांवर गेले आहे.
थंडी वाढू लागली आहे. परंतु रुग्णांची संख्या ४०० ते ५०० दरम्यान कायम आहे. मागील पाच दिवसांत, ११ डिसेंबर रोजी ३९८, १२ डिसेंबर रोजी ३७६, १३ डिसेंबर रोजी ३०० तर १४ डिसेंबर रोजी २८२ रुग्ण आढळून आले. मंगळवारी मात्र चाचण्यांची संख्या वाढताच रुग्णसंख्याही ४००वर गेली. आज ४७१४ आरटीपीसीआर तर १४४८ रॅपीड अँटिजेन असे एकूण ६१६२ चाचण्या झाल्या. यात अँटिजेन चाचणीतून ५८ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील ३३८, ग्रामीण भागातील ७६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ४ आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७७४ झाली आहे. यातील १४४९ रुग्ण रुग्णालयात तर ४३२५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.
- ३० कोविड रुग्णालयात रुग्णच नाहीत
नागपूर जिल्ह्यात ९१ खासगी कोविड रुग्णालयांपैकी ३० कोविड रुग्णालयात रुग्णच नाहीत. ३५वर रुग्णालयात १० च्या आत रुग्ण आहेत. पुढील आदेशापर्यंत कोविड खाटा रिकाम्या ठेवण्याचा प्रशासनाच्या सूचना आहेत. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या मेडिकलमध्ये सर्वाधिक १७६, मेयोमध्ये ६० तर एम्समध्ये ३१ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-दैनिक संशयित : ६१६२
-बाधित रुग्ण : ११७९११
_-बरे झालेले : १०८३२४
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५७७४
- मृत्यू : ३८१३