नागपुरात अतिरिक्त पोलीस आयुक्त फुलारी, झळके रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:02 PM2020-09-25T23:02:12+5:302020-09-25T23:03:57+5:30
शहर पोलीस आयुक्तालयात बदली झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी आणि दिलीप झळके या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयात बदली झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी आणि दिलीप झळके या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे.
हे दोन्ही अधिकारी २००५ च्या बॅचचेआयपीएस अधिकारी आहेत. फुलारी हे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून तर झळके हे दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी नागपुरात सेवा दिलेली आहे. १९९७ ते २००२ या कालावधीत सुनील फुलारी यांनी साहायक पोलीस आयुक्त म्हणून नागपुरात कार्यरत होते. दोन वर्षांपासून ते पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते. दिलीप झळके औरंगाबाद कारागृह परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कारागृहातील सेवा सुधारणांवर विशेष भर दिलेला होता. तत्पूर्वी नागपुरात राज्य महामार्ग पोलिसाचे अधीक्षक म्हणून कार्य केले आहे. गुन्हे शाखेत आर्थिक विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी ७ वर्षांपूर्वी नागपुरात सेवा दिलेली आहे.
अतिरिक्त आयुक्त म्हणून नागपुरात बदली झालेले नवीनचंद्र रेड्डी अद्याप येथे रुजू झालेले नाही. येथे रुजू झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त पदाचा बॅकलॉग पूर्ण होणार आहे. ते कधी येणार, ते अद्याप स्पष्ट झाले नाही.