नागपूर जिल्ह्यासाठी पाणीटंचाईचा सात कोटींचा अतिरिक्त आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 08:30 PM2019-06-03T20:30:56+5:302019-06-03T20:31:58+5:30
जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़. उपाययोजना करताना जिल्हा परिषद हातघाईस आली आहे़ यामध्ये अधिक गती यावी याकरिता जिल्हाधिकारी अश्वीन मुदगल यांनी अतिरिक्त पाणीटंचाई कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे़. ७ कोटी ८ लाख ७४ हजार रुपयांचा हा आराखडा आहे़.
यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांच्या संख्येत आणखी १३ ने वाढ होण्याची शक्यता आहे़ एप्रिल ते जून महिन्याचा आराखडा हा ३३१ गावांसाठी ४ कोटी ६ लाख ६० हजार रुपयांचा होता़ या उपाययोजना तोक ड्या पडत होत्या़ कामाची गतीही मंदावली होती़ तशा आशयाच्या तक्रारी स्थानिक सरपंचाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तशी मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागानेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती़ त्यानुसार अतिरिक्त आराखड्याला मंजुरी देण्यात आली़ २४९ गावांत यातून उपाययोजना होईल़ बोअरवेल खोदकामाचे काम पूर्णत्वास आले आहे़ मंजूर आराखड्यात नळ योजनांची दुरुस्ती आणि विहीर खोलीकरणाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे़ नळ योजनांची दुरुस्ती ही ७७ गावांमध्ये ३ कोटी ६४ लाख, नवीन विंधन विहिरी १०२ गावांत होईल़ यावर १ कोटी ३७ लाख ८० हजार रुपये, तात्पुरत्या नळ योजना तीन गावांमध्ये २५ लाख रुपये खर्चून तर विहीर खोलीकरण ७३ गावांत १ कोटी १९ लाख, १३ गावांतील टँकरसाठी १५ लाख १० हजार रुपये आणि खासगी विहीर अधिग्रहण १०९ गावांत होईल़
या तालुक्यातील गावांचा समावेश
नागपूर १२, सावनेर ४१, कळमेश्वर ३०, काटोल ५६, नरखेड ७४, उमरेड २, भिवापूर १, कुही ८, मौदा २५.