Aditya Thackeray: 'गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 08:02 PM2022-08-27T20:02:35+5:302022-08-27T20:05:34+5:30
नागपुरात शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आणि तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊटला आले होते.
नागपूर - दसरा मेळावा शिवसेनेचा असतो आणि शिवसेनेचाच राहणार, जनता देखील हे बघत आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज देतोय, पण तो अर्ज कुणी स्वीकारत नाही. हे सरकार दडपशाहीचे सरकार आहे. खोके सरकार गद्दारी पुढे नेत आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी नागपुरात केली. तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं.
नागपुरात शहिद विजयभाऊ कापसे यांचे स्मृतीप्रित्यर्थ आणि तान्हा पोळ्याच्या निमित्त दक्षिण नागपूर सुभेदार लेआऊटला आले होते. त्यावेळी, लहान मुलांसोबत त्यांना भेट दिली. प्रामाणिक माणसाच्या मागे जनताही उभी राहिल. महाराष्ट्रासाठी संधीचं सोनं करु, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, गावकऱ्यांचे जीवन सुखी करण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजे असल्याचंही ते म्हणाले.
शिवसेना शहर प्रमुख दीपक कापसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई मनपात बदल्याचे सरकार झाले आहे. त्यांनी परवानगी दिलेली नाही, तरी देखील शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे. जनता देखील हे बघत आली आहे. दसरा मेळावा हायजॅक वैगेरे केलेला नाही. या गद्दारांना निमित्त हवं होतं, यांच्याकडून जे नाट्य चाललं ते लोकांना नकोय. माझ्या ज्या यात्रा चालल्या त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय.
'भूमिका मान्य असेल ते सोबत येतील'
संभाजी ब्रिगेडची युतीच्या घोषणेबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडली नाही, शिवसेनेची भूमिका कायम आहे. ज्यांना ज्यांना आमचं हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील.