जीवघेणा ‘खड्डा’ प्रशासनाला दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:02+5:302020-12-22T04:10:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर गत महिनाभरापासून एक खड्डा पडला असून, त्यातून सकाळच्या सुमारास हळूवार ...

The administration did not see the deadly 'pit' | जीवघेणा ‘खड्डा’ प्रशासनाला दिसेना

जीवघेणा ‘खड्डा’ प्रशासनाला दिसेना

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर गत महिनाभरापासून एक खड्डा पडला असून, त्यातून सकाळच्या सुमारास हळूवार पाणी वाहते. पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे‌ सुसाट वाहनचालकांना क्षणात मोठा धक्का बसतो. या धक्क्यामुळे कधी अपघात हाेईल, याचा नेम नाही. आवागमन करणाऱ्या प्रत्येकाला दिसणारा हा खड्डा प्रशासनाला मात्र का दिसू नये, यावर आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

स्थानिक बॉईज हायस्कूल समोरील मार्गावर पडलेला हा खड्डा गेल्या महिनाभरापासून जीवघेणा ठरत आहे. या मार्गाच्या खालून गेलेली पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कदाचित लिकेज झाल्यामुळे या खड्ड्यातून सकाळच्या सुमारास हळुवार पाणी वाहत असते. अशावेळी पाणी साचले असल्यामुळे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागते. हा खड्डा पाईपलाईनच्या लिकेजमुळे पडला की अन्य कारणामुळे याचा उलगडा मात्र झालेला नाही. खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून, पाण्याचा अपव्ययसुद्धा होत आहे. याकडे प्रशासानने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

....

खड्डेच खड्डे

राष्ट्रीय मार्गावरील मरू नदी ते उमरेड मार्गावर डझनावर खड्डे पडले असून, ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. भिवापूर बसस्थानक परिसरातही असाच एक खड्डा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. मात्र हे खड्डे बुजविण्याचे काम प्रशासन करताना दिसत नाही. भिवापूर-जवळी या राज्य मार्गाचीसुद्धा खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झालेली आहे. ‘सुंदर रस्ता-गावाचा गुलदस्ता’ हे ब्रीद या मार्गांना निरर्थक ठरत आहे.

Web Title: The administration did not see the deadly 'pit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.