लसीकरणासाठी प्रशासन भटक्यांच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:09 AM2021-05-14T04:09:33+5:302021-05-14T04:09:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : परिसरातील काही गावांलगत भटक्या समाजबांधवांच्या वस्त्या आहेत. वाढते काेराेना संक्रमण लक्षात घेता, तेथील नागरिकांचे ...

Administration Nomadic Doors for Vaccination | लसीकरणासाठी प्रशासन भटक्यांच्या दारी

लसीकरणासाठी प्रशासन भटक्यांच्या दारी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : परिसरातील काही गावांलगत भटक्या समाजबांधवांच्या वस्त्या आहेत. वाढते काेराेना संक्रमण लक्षात घेता, तेथील नागरिकांचे काेराेना प्रतिबंधक लसीकरण करवून घेणे गरजेचे हाेते. विनंती करूनही त्यांनी रुग्णालयात येऊन लसीकरण करवून घेण्यास सुरुवातीला विराेध दर्शविला हाेता. शेवटी आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वस्ती गाठून त्यांचे लसीकरण करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी जामगड (ता. काटाेल) येथील ८८ भटक्या समाजबांधवांचे लसीकरण करण्यात आले.

काटाेल तालुक्यातील तरोडा, जामगड, वाई व पंचधार या गावालगत भटक्या समाजबांधवांच्या वस्त्या आहेत. येथील नागरिकांनी लसीकरण करवून घ्यावे, यासाठी काेंढाळी प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री वाळके यांनी तिथे जनजागृती करीत नागरिकांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही ऐकून घ्यायला तयार नसल्याने त्यांनी ही बाब माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांच्या आढावा बैठकीमध्ये मांडली.

दरम्यान, मंगळवारी (दि. ११) तहसीलदार अजय चराडे, खंडविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शशांत व्यवहारे, डॉ. जयश्री वाळके, ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी तरोडा व जामगड येथे जाऊन लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. यात सरपंच वर्षा वाहने, विजयसिंह रणनवरे, पंचायत समिती सदस्य लता धारपुरे, किस्मेत चव्हाण सहभागी झाले हाेते. भटक्या समाजबांधवांनी सुरुवातीला विराेध दर्शविला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर बुधवारी (दि. १२)लसीकरणाला सुरुवात करीत पहिल्या दिवशी ८८ जणांचे लसीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांनी भेट देऊन लसीकरणाची पाहणीही केली.

Web Title: Administration Nomadic Doors for Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.