कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास प्रशासन सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:25+5:302021-09-02T04:15:25+5:30

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावाने गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशासकीय कामांना पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सोबतच तिसऱ्या ...

Administration ready to face third wave of corona! | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास प्रशासन सज्ज!

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास प्रशासन सज्ज!

Next

नागपूर : कोरोना संक्रमणाच्या प्रादुर्भावाने गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या प्रशासकीय कामांना पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सोबतच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपचारासंबंधी आवश्यक उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली. मंगळवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या.

जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागूल, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, माहिती कार्यालयाचे अनिल गडेकर उपस्थित होते. लवंगारे म्हणाल्या, कोरोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे मागील दीड वर्षात प्रशासकीय कार्य रखडले. ते पूर्वपदावर करण्याला आपण प्राधान्य दिले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका व्यक्त होत असल्याने आवश्यक त्या उपाययोेजना हाती घेतल्या जात आहेत. नागपुरातील एम्सच्या इमारतीचा उपयोग यासाठी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. डेल्टाचे रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. मनुष्यबळ आणि त्यांच्यावरील खर्चाच्या दृष्टीने निधीच्या उपाययोजनेची माहिती त्यांनी दिली.

त्या म्हणाल्या, विदर्भाच्या विकासाची मानके वेगळी आहेत. येथे पर्यटनातून अधिक चांगल्या रीतीने विकास होऊ शकतो. यासाठी वन पर्यटन व इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. जैवविविधतेसाठी ग्रामीण भागांमध्ये लोक व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले जाईल. वनरक्षक व ग्रामसेवकांच्या माध्यमातून गावांमध्ये जैवविविधतेसंदर्भात जनजागृती केली जाईल.

विदर्भात रिफायनरी सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू आहे. यासाठी आवश्यक जमिनीचा शोध घेतला जात आहे. सीरो सर्व्हेचे काम जीएमसीच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागपुरातील फ्लाइंग क्लबमधील रिक्त पदांसंदर्भात अलीकडेच बैठक झाली असून, लवकरच डीजीसीएकडून मंजुरीचे पत्र मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विदर्भातील शहरांचे आणि नद्यांचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Administration ready to face third wave of corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.