Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 08:55 PM2019-09-21T20:55:54+5:302019-09-21T21:13:08+5:30

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

Administration's 'Management Plan' prepared for elections | Maharashtra Assembly Election 2019 : निवडणुकीसाठी प्रशासनाचा 'मॅनेजमेंट प्लॅन' तयार

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल पत्रपरिषदेत माहिती देतांना. सोबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश अ‍ेला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा

Next
ठळक मुद्देआचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज : २१,९७० अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही शांततेत पार पडेल, यासाठी प्रशासनाचा ‘इलेक्शन मॅनेजमेंट प्लॅन’ तयार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले की, जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहे. या १२ ही ठिकाणी मतदान व मतमोजणी होईल. निवडणुकीच्या कामासाठी एकूण २१९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून ते सर्व उपलब्ध आहेत. यासोबतच ४३८२ अधिकारी-कर्मचारी हे रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त यासर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे तीन टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरचे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाºयांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. २७ तारखेपर्यंत ते चालणार आहे. दक्षता पथकही तयार करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात चार दक्षता पथक नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक पथकात चार ते पाच कर्मचाºयांचा समावेश राहिल. तसेच कॅमेरा आणि सांख्यिकी पथकसुद्धा असेल. मध्य प्रदेशातील दोन जिल्हे लागून आहे. या जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची तस्करी होता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, शिरिष पांडे आदी उपस्थित होते.

५५ संवेदनशील मतदान केंद्र
निवडणुकीसाठी ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यातील ५५ केंद्र संवेदनशील आहे. या संवेदनशील मतदार केंद्रावरून सीसीटीव्ही लावण्यात येणार असून अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे वेब कास्टींग करण्यात येणार आहे.
लोकसभेच्या तुलनेत ३० मतदान केंद्र अधिक आहेत. एका विधानसभा संघात एक केंद्र विशेष महिलांचे असणार आहे.

७७२१ बॅलेट युनिटची गरज
निवडणुकीकरता ७७२१बॅलेट युनिट तर ५५१५कंट्रोल युनिट आवश्यक आहे. प्रशासनाकडे ८१८०बॅलेट युनिट आणि ८८८३ कंट्रोल युनिट आहेत. ५९५६ व्हीव्हीपॅट मशीन असून १०३ मशीन कमी आहेत. आंध्र प्रदेशकडून २८० व्हीव्हीपॅट मशीन मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुद्गल यांनी सांगितले.

८९०२ पोलिंग एजंट राजकीय पक्षाकडून नियुक्त
राजकीय पक्षांकडून ८९०२ पोलिंग एजंटची नियुक्ती केली आहे. यात सर्वाधिक ४२१६ एजंटची नियुक्ती भाजपने केली आहे. तर ३४३४ कॉंग्रेस, बसपने २०० तर सेनाने ४४७ एजंटची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ७८ हजार मतदार वाढले

 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर जिल्ह्यात तब्बल ७८ हजार ५७५ मतदार वाढले आहेत. यामध्ये तब्बल ७३९३६ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील म्हणजे नवमतदार आहेत. यातही महिला मतदारांची संख्या अधिक आहे, हे विशेष. 
 जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 
 गेल्या ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या यादीत जिल्ह्यात ४१ लाख ६३ हजार ३६७ मतदार आहे. यात पुरुष २१ लाख ३१ हजार १४९, महिला २० लाख ३२ हजार ११८ व १०० तृतिय पंथीय मतदात्यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर विशेष मोहिमेंतर्गत मतदारांची भर पडली असून ७८ हजार ५२५ नवमतदार वाढले आहे. त्यात ३६ हजार ४०९ पुरुष व ४२ हजार ११२ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील ६३ हजारांनी मतदार वाढले असून यंदाच्या विधानसभेत ७३ हजार ९३६ नवमतदारांचा समावेश आहे. त्यांना आकर्षित करण्यावर विशेष भर राजकीय पक्षांचा राहणार आहे.
 
८ हजार ८३७ मतदार वगळले
लोकसभा निवडणुकीनंतर ८ हजार ८३७ मतदार वगळण्यात आले. त्यात ५ हजार ७०८ मृत असून १ हजार ४५३ स्थलांतरित व ८७६ डुप्लिकेट मतदार आढळून आले.

Web Title: Administration's 'Management Plan' prepared for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.