१० तालुका कृषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईचा बडगा
By admin | Published: May 7, 2014 01:16 AM2014-05-07T01:16:10+5:302014-05-07T14:08:52+5:30
अमरावती विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील १४ तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी चारच अधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे
कार्यशाळेला दांडी मारल्याचे प्रकरण
जितेंद्र दखने
अमरावती विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील १४ तालुका कृषी अधिकार्यांपैकी चारच अधिकार्यांनी हजेरी लावल्यामुळे उर्वरित १० गैरहजर तालुका कृषी अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. कृषी विभागामार्फत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात रविवार ४ मे रोजी विभागीय खरीपपूर्व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
पाचही जिल्ह्यांतील सर्वच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तंत्रज्ञ मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आदींना विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला हजर राहण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. परंतु या कार्यशाळेमुळे रविवारच्या सुटीवर पाणी फेरल्याने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेकडे काहींनी पाठ फिरविली. विशेष म्हणजे या कार्यशाळेला विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकारी बैठकीला उपस्थित होते. मात्र सभागृहातील तालुका कृषी अधिकार्यांची गैरहजेरी सातत्याने दिसून येत असल्याने या कार्यशाळेत कृषी सहसंचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
अखेर याच ठिकाणी जिल्हानिहाय तालुका कृषी अधिकार्यांना उभे राहण्याचे फर्मान सोडत उपस्थितांची मोजणी केली असता यामध्ये अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी चार अधिकारी हजर होते. १० तालुका कृषी अधिकारी गैरहजर होते. विभागीय खरीपपूर्व कार्यशाळेला जे अधिकारी गैरहजर होते त्यांना वरिष्ठांच्या आदेशानुसार कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात येणार आहे. रमेश भताणे कृषी अधीक्षक अधिकारी १० अधिकार्यांची कार्यशाळेला दांडी कृषी विभागामार्फत विभागीय खरीपपूर्व कार्यशाळा आयोजित केली होती. याबाबत विभागातील सर्वच तालुका कृषी अधिकार्यांना रितसर कळविल्यानंतरही जिल्ह्यातील अमरावती, तिवसा, भातकुली, चिखलदरा, वरूड, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार अशा दहा तालुका कृषी अधिकार्यांनी या कार्यशाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. चार अधिकार्यांनीच लावली हजेरी ४अकोला येथील कार्यशाळेला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, मोर्शी, धारणी आणि अंजनगाव सुर्जी अशा चारच तालुका कृषी अधिकार्यांनी हजेरी लावली होती.