प्रशासकीय कोंडीचा फटका
By Admin | Published: February 26, 2015 02:21 AM2015-02-26T02:21:47+5:302015-02-26T02:21:47+5:30
आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने निर्णयावर परिणाम झाला आहे.
नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने निर्णयावर परिणाम झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने विकासाला फटका बसला आहे.
काही दिवसांपूर्वी श्याम वर्धने यांना नासप्रुचे सभापती म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर आले आहे. अपर आयुक्त हेमंत पवार यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली करण्यात आली आहे. परंतु त्या रिक्त जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी मनपात सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सांभाळणारे अच्युत हांगे यांची मीराभार्इंदर महापालिकेत बदली करण्यात आली. त्यांचे पद अद्याप रिक्त आहे. एसआरएचे सचिव अजय रामटेके यांच्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे हे पद रिक्तच आहे. या विभागामार्फत बीएसयूपी योजना राबविली जाते. रामटेके यांच्या बदलीमुळे योजनेवर परिणाम झाला आहे.
महापालिकेला ‘अ’ वर्ग मिळाला आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याने याचा निर्णयावर परिणाम होत आहे. पवार हे अपर आयुक्त असताना तातडीने निर्णय होत होते.
त्यांच्याक डे अनेक विभागांची जबाबदारी होती. त्यांच्या बदलीमुळे सामान्य प्रशासन विभाग पुन्हा अनाथ झाला आहे. (प्रतिनिधी)