नागपुरात मेट्रो पिलरचे विद्रुपीकरण; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:37 AM2019-05-22T10:37:50+5:302019-05-22T10:40:00+5:30
वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील पिलर क्रमांक ३५ चे विद्रुपीकरण करीत त्यावर लेखन केल्याबद्दल महामेट्रोतर्फे अनोळख्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मेट्रो पिलरचे विदु्रपीकरण झाल्याच्या या घटनेची महामेट्रोने गंभीर दखल घेतली आहे. तक्रारीनंतर सोनेगांव पोलीस स्टेशनमध्ये भादंवि १८६० च्या कलम २९४ तसेच सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे विदु्रपीकरण करणाऱ्या व्यक्तीला अटक होऊ शकते तसेच त्याच्याकडून दंडदेखील आकारला जाऊ शकतो. महामेट्रो नागपूरतर्फे प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली असून खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो रेल्वेच्या फेºया सुरू झाल्या आहेत. एकीकडे प्रवासी वाहतुकीला नागपूरकर प्रतिसाद देत असताना दुसरीकडे मात्र नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या मालमत्तेचे विदु्रपीकरण करण्यात येत आहे.
मेट्रो पिलरवर पोस्टर, जाहिरातीचे फलक लावणे, लिखाण करणे किंवा कुठल्याही प्रकारे विद्रुपीकरण करणे बेकायदेशीर असून हा दंडात्मक गुन्हा आहे. कायद्याच्या अंतर्गत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. नागपूरकरांनी अशा प्रकारचे कुठलेही विदु्रपीकरण करू नये, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.