ॲड. अनिल गोवारदीपे बार कौन्सिलचे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:08 AM2021-03-01T04:08:43+5:302021-03-01T04:08:43+5:30

नागपूर : उपराजधानीतील ॲड. अनिल गोवारदीपे यांची रविवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. ...

Adv. Anil Govardipe President of the Bar Council | ॲड. अनिल गोवारदीपे बार कौन्सिलचे अध्यक्ष

ॲड. अनिल गोवारदीपे बार कौन्सिलचे अध्यक्ष

Next

नागपूर : उपराजधानीतील ॲड. अनिल गोवारदीपे यांची रविवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भाची मान अभिमानाने उंचावली आहे.

गोवारदीपे नागपुरात १९९८ पासून वकिली व्यवसाय करीत आहेत. दरम्यान, १९९९ ते २००४ पर्यंत त्यांनी मोक्कातील प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून यशस्वीपणे कार्य केले. त्यांना संघटनात्मक कार्याचाही दीर्घ अनुभव आहे. ते २००२ ते २००४ पर्यंत नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे सचिव होते. २०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या सदस्यपदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर ते कौन्सिलच्या व्यवस्थापनामधून कधीच बाहेर पडले नाही. तेव्हापासून ते सतत कौन्सिलच्या सदस्यपदाची निवडणूक जिंकत आहेत. गेल्या निवडणुकीत (२०१९) त्यांनी विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते मिळविली होती. आतापर्यंत त्यांनी दोनदा कौन्सिलचे उपाध्यक्षपद सांभाळले आहे. आता त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे विदर्भातील विधिक्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

-----------------

नागपूरमध्ये ॲडव्होकेट अकॅडमी आणणार

नागपूरमध्ये ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्याचे स्वप्न असून त्याकरिता सरकारकडून जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ॲड. अनिल गोवारदीपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच, वकिलांच्या हितासाठी निरंतर विधी शिक्षण कार्यक्रम, जेएमएफसी व सरकारी वकील परीक्षा मार्गदर्शन, नवोदित वकिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मूलभूत विधी शिक्षण इत्यादी उपक्रम अधिक व्यापकपणे चालविण्यावर भर देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Adv. Anil Govardipe President of the Bar Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.