जीएसटीमुळे देश आणि नागरिकांचा फायदा
By admin | Published: July 11, 2017 01:43 AM2017-07-11T01:43:31+5:302017-07-11T01:43:31+5:30
केंद्र शासनाने जीएसटी (गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) आणून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे : पिपळा फाटा येथे जीएसटीवर कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाने जीएसटी (गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) आणून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांना होत असलेला त्रास यामुळे कमी होणार. अनेक प्रकारच्या कराऐवजी ‘एक देश; एक कर’ अस्तित्वात आणला. केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे हितकारक आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू करमुक्त झाल्या असून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे, असे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष नागपूर (ग्रामीण) तालुक्याच्यावतीने पिपळा फाटा येथील चौधरी सभागृहात आयोजित जीएसटी कार्यशाळेत ना. बावनकुळे बोलत होते. जीएसटीवर प्रसिद्ध आर्थिक विश्लेषक विजयकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नागपूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, भाजपचे नागपूर तालुकाध्यक्ष नरेश भोयर, भाजप नेते डी. डी. सोनटक्के, भगवान मेंढे, रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने, डॉ. प्रीती मानमोडे, स्वाती आखतकर, लीला हातीबेड, विद्या मडावी, दिलीप नंदागवळी, डॉ. पूजा धांडे, मनोज चवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यशाळेत विजयकुमार शिंदे यांनी विविध उदाहरणांसह जीएसटीचे फायदे समजावून सांगितले. दरम्यान याच कार्यक्रमात पिपळा येथील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संचालन सचिन घोडे यांनी केले. प्रभू भेंडे यांनी आभार मानले. आयोजनासाठी सुनील कोडे, चंद्रमणी नगरारे, मनोज लक्षणे, नरेंद्र नांदूरकर, प्रभाकर आचार्य, रमेश तिडके, कैलास ठाकरे, हरीश कंगाले, रामराज खडसे, अजय फलके, पप्पू राऊत, देवेंद्र गौर, कमलाकर शेंडे, राजकुमार वंजारी, रवी गायधने, विनय ठाकूर, लक्ष्मीकांत बनोदे, विजय देवगडे, सूरज शिंदे, अजय भाईक, निखिल भोयर, अंकित येरणे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने नागरिक आणि भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.