पोर्टेबिलिटीचा महिन्याला १५ हजारांवर ग्राहकांना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:41 PM2018-04-19T22:41:11+5:302018-04-19T22:41:28+5:30

मोबाईलसारखीच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलता येत आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्य वाटप योजनेंतर्गत राज्यात ही सुविधा नागपूरला सुरू करण्यात आली आहे. शहरात याचा लाभ महिन्याला १५ हजारावर रेशनकार्डधारक घेत आहे.

The advantage of portability is 15 thousand subscribers a month | पोर्टेबिलिटीचा महिन्याला १५ हजारांवर ग्राहकांना फायदा

पोर्टेबिलिटीचा महिन्याला १५ हजारांवर ग्राहकांना फायदा

googlenewsNext
ठळक मुद्देसोयीच्या दुकानात रेशन खरेदी : रेशन व्यवस्थेत पारदर्शकता

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मोबाईलसारखीच आता शिधापत्रिकाधारकांनाही ‘पोर्टेबिलिटी’ची सुविधा अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून त्याच्या हिश्श्याचे धान्य उचलता येत आहे. आधार क्रमांकावर आधारित संगणकीय धान्य वाटप योजनेंतर्गत राज्यात ही सुविधा नागपूरला सुरू करण्यात आली आहे. शहरात याचा लाभ महिन्याला १५ हजारावर रेशनकार्डधारक घेत आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला आहे. ‘पोर्टेबिलिटी’ ही विशेष योजना लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. स्मार्टकार्डवर आधारित रेशनकार्डमुळे स्वस्त धान्य वितरण योजनेंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. यामध्ये ग्राहक त्याच्या सोईच्या दुकानातून धान्य खरेदी करू शकतो.
गेल्यावर्षी आॅक्टोबर महिन्यात राज्यात सर्वप्रथम नागपूर शहरात ही ‘पोर्टेबिलेटी’ योजना सुरू केली. या सुविधेमुळे ग्राहकांना आता रेशनकार्डच्या माध्यमातून आपल्या सोईच्या व जवळच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यात येत असल्यामुळे याला प्रतिसाद मिळत आहे. शहरात महिन्याला सुमारे १५ हजारावर नागरिक पोटेर्बीलीच्या माध्यमातून धान्याची उचल करीत आहे. ही योजना गेल्या मार्च महिन्यापासून ग्रामीण भागातही सुरू झाल्याने ग्रामस्थांकडूनही याला प्रतिसाद मिळत असून, यामुळे दुकानांमधील कार्डधारकांचे व्यवहार वाढले आहेत.
 कार्डधारकांची धावपळ वाचली
पूर्वी आपल्या ठरावीक दुकानांमधूनच ग्राहकांना धान्याची उचल करावी लागत असल्यामुळे ते दुकान दूर असल्यास कानाडोळा करत होते. मात्र आता पोर्टेबिलीटी सुरू झाल्यामुळे रेशनकार्डधारक आपल्या सोईच्या व जवळच्या कुठल्याही दुकानातून धान्याची उचल करू शकत आहे. याचा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभही घेत आहे.
 प्रशांत काळे, अन्न पुरवठा अधिकारी नागपूर शहर

Web Title: The advantage of portability is 15 thousand subscribers a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.