वकिलावरील हल्ला प्रकरण : आरोपी मरण्या-मारण्याचा निर्णय घेऊनच आला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 11:53 PM2018-12-22T23:53:19+5:302018-12-22T23:54:12+5:30
अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अॅड. नारनवरे यांना त्यांच्या नातेवाईकांनी मेयोतून एका खासगी इस्पितळात हलविले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले अॅड. नारनवरे यांना त्यांच्या नातेवाईकांनी मेयोतून एका खासगी इस्पितळात हलविले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास आरोपी नोकेशने अॅड. नारनवरे यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यापूर्वीच नोकेशने विष पिले होते. त्यामुळे त्याला मेयोत दाखल केल्याच्या काही वेळानंतर डॉक्टरांनी नोकेशला मृत घोषित केले. अॅड. नारनवरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कुºहाडीचे घाव बसल्यामुळे त्यांच्यावर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना मेयोतून मेडिकल चौकातील एका खासगी इस्पितळात हलविले. तेथे त्यांच्या चेहºयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, डोक्यावर गंभीर स्वरुपाचा घाव असल्याने शस्त्रक्रिया करतानाच धोका होऊ शकतो, याची डॉक्टरांनी अॅड. नारनवरे यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली. त्यामुळे डोक्यावरची शस्त्रक्रिया करायची की नाही, त्याबाबत नातेवाईकांनी डॉक्टरांना निर्णय सांगितला नाही. परिणामी अॅड. नारनवरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
राज्यातील विधी वर्तुळात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, असा प्रश्न प्रत्येक जण विचारत आहेत. या प्रकरणाशी एक नाजूक पैलू जुळला असल्याने तसेच प्रकरण वकिलाशी संबंधित असल्याने पोलीस या संबंधाने अत्यंत सावधगिरीने तपास करीत आहेत.
मृत नोकेशचे भाऊ क्रांती कुंडलिक भास्कर (वय ३१) हे अंबाझरी आयुध निर्माणीत कार्यरत आहेत. त्यांचे आईवडील सध्या त्यांच्याकडेच राहतात. शनिवारी दुपारी नोकेशचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला. त्यानंतर नोकेशवर वाडीच्या घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.