वकिलांचे आंदोलन : 'सीएए' विरोधी विद्यार्थ्यांसोबतच्या हिंसेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:29 AM2020-01-14T00:29:22+5:302020-01-14T00:30:02+5:30
सीएए, एनआरसी व एनपीआरचा विरोध करणाऱ्या जेएनयू, जामिया व इतर काही शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा नागपूर यंग लॉयर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीएए, एनआरसी व एनपीआरचा विरोध करणाऱ्या जेएनयू, जामिया व इतर काही शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचा नागपूर यंग लॉयर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. हे आंदोलन दुपारी २.३० वाजता जिल्हा न्यायालयापुढे पार पडले.
आंदोलनात शंभरावर वकील सहभागी झाले होते. दरम्यान, त्यांनी संविधान वाचवा, देश वाचवा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे नारे देऊन घटनेचा जोरदार निषेध केला. आंदोलनातील वकिलांमध्ये अक्षय समर्थ, अभय रणदिवे, सुदीप जयस्वाल, तरुण परमार, सतीश उईके, शादाब खान, यशवंत मेश्राम, आकीद मिर्झा, रेखा बारहाते, सुनीता पॉल, शबाना दिवाण, अर्चना गजभिये, मंगला राईकवार, श्याम शाहू, मो. फैझल, जयमाला लवात्रे आदींचा समावेश होता.