वकिलाची आत्महत्या

By admin | Published: October 20, 2016 02:59 AM2016-10-20T02:59:22+5:302016-10-20T02:59:22+5:30

एसएनडीएलचे कायदेशीर सल्लागार प्रफुल्ल कुमार गुप्ता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Advocate's Suicide | वकिलाची आत्महत्या

वकिलाची आत्महत्या

Next

पत्नीला कोंडून घेतला गळफास : एसएनडीएलचे होते कायदेशीर सल्लागार
नागपूर : एसएनडीएलचे कायदेशीर सल्लागार प्रफुल्ल कुमार गुप्ता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरसपेठ येथील बजरंग अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री घडली.
३२ वर्षीय प्रफुल्ल यांनी बजेरिया येथील मौसमी तिवारी यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबात पती-पत्नीसह दोन लहान मुलं (साडेपाच व आणि साडेतीन वर्ष) आहेत. मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी ११ वाजता त्यांचा पत्नीसोबत थोडासा वाद झाला.
प्रफुल्ल यांनी रागाच्या भरात पत्नीला बेडरूममध्ये बंद केले. यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन त्यांनी गळफास घेतला. पत्नीला याबाबत काहीच कल्पना नव्हती तिने दरवाजा उघडण्यासाठी खूप आवाज दिला. कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने ती चिंताग्रस्त झाली. अखेर तिने पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवर सूचना दिली. इमामवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले घरातील दरवाजा बंद असल्याने पोलिसांना काहीतरी अनर्थ घडल्याचा संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी मौसमीच्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रफुल्ल यांना दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा प्रफुल्ल फासावर लटकलेले होते. त्यांना तात्काळ मेडिकलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
प्रफुल्ल हे मूळचे यवतमाळ येथील रहिवासी होते. ते खूप वर्षांपासून नागपुरात राहत होते. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. घटनेची माहिती होताच त्यांचे नातेवाईकही यवतमाळवरून नागपुरात पोहोचले. त्यांनी मृतदेह यवतमाळला नेण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु बहुतांश नातेवाईक नागपुरातच राहत असल्याने त्यांचे अंत्यसंस्कार नागपुरात करण्यावर एकमत झाले. या घटनेमुळे शहरातील वकीलांमध्ये शोक पसरला आहे. प्रफुल्ल गुप्ता हे सर्वांशीच मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव सर्वांनाच आवडायचा. त्यांची वकिलीही चांगली चालत होती.(प्रतिनिधी)

कुणीही मदत केली नाही
पतीने रागात स्वत:ला आणि तिला खोलीत बंद करून घेतल्यानंतर चिंताग्रस्त मौसमीने मदतीसाठी शेजाऱ्यांना खूप आवाज दिला. खूप प्रयत्न करूनही कुणी मदतीसाठी आले नाही. शेवटी सर्वांकडून मदतीची अपेक्षा संपल्याने तिने पोलिसांना फोन केला. पोलीस दरवाजा तोडून आत आले. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता.

Web Title: Advocate's Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.