पहिल्यांदाच दोन हजारांवर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:09 AM2021-04-08T04:09:19+5:302021-04-08T04:09:19+5:30

सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/मौदा/रामटेक/उमरेड/नरखेड/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या संख्येने २०४८ चा आकडा गाठला. २५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीमुळे ...

Affected over two thousand for the first time | पहिल्यांदाच दोन हजारांवर बाधित

पहिल्यांदाच दोन हजारांवर बाधित

Next

सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/मौदा/रामटेक/उमरेड/नरखेड/कुही/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या संख्येने २०४८ चा आकडा गाठला. २५ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीमुळे आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सावनेर तालुक्यात आणखी ३५० रुग्णांची भर पडली तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. सावनेर शहरात १२० तर ग्रामीण भागात २३० रुग्णांची नोंद झाली.

काटोल तालुक्यात १६८ रुग्णांची नोंद झाली. त्यात शहरातील यात शहरातील ८० तर ग्रामीण भागातील ८८ रुग्णांचा समावेश आहे.

कळमेश्वर तालुक्यात १४१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ३२ तर ग्रामीण भागातील १०९ रुग्णांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात ११३८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३१९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे १०४, डिगडोह (४६), हिंगणा व टाकळघाट प्रत्येकी ३०, निलडोह (२२), गुमगाव (१७, इसासनी (१२), किन्हीधानोली व रायपूर येथे प्रत्येकी ७, खापरी गांधी (६), नागलवाडी , कान्होलीबारा,वडगाव येते प्रत्येकी ५, टेंभरी , वागदरा येथे प्रत्येकी ४, शेषनगर (२) तर आमगाव, गिरोला , मांडवघोराड, संगम, जुनेवानी, शिरुर, मांडवा , कानोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कुही तालुक्यात ५५० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मांढळ येथे एका रुग्ण महिलेचा मृत्यू झाला.

नरखेड तालुक्यात ८५ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५ तर ग्रामीण भागातील ८० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५१२ तर शहरातील ६९ इतकी झाली आहे.

रामटेक तालुक्यात ६० रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील २८ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात १०९ रुग्णांची भर पडली. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या १४१३ झाली आहे. यातील ९१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे तर ४६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सलग तीन दिवस पन्नासावर रुग्ण

उमरेड तालुक्यात अगदी प्रारंभापासून ते आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी इतर तालुक्याच्या तुलनेत कमी आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढतो आहे. सलग तीन दिवसांपासून पन्नासावर रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. ५ एप्रिल रोजी ५३, ६ एप्रिल रोजी ७३ तसेच बुधवारी (दि.७ एप्रिल) रोजी ६६ रुग्णांची नोंद झाली. त्यामध्ये ३९ रुग्ण शहरातील तर २७ ग्रामीण भागातील आहेत.

Web Title: Affected over two thousand for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.