१३ वर्षांनी आली बुर्गी गावात बस
By admin | Published: July 3, 2017 03:43 PM2017-07-03T15:43:32+5:302017-07-03T15:43:32+5:30
तालुक्यातील बुर्गी गावात मागील १३ वर्षाआधी सेवा सुरू होती आज तब्बल १३ वर्षांनी ही बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
एटापल्ली:-तालुक्यातील बुर्गी गावात मागील १३ वर्षाआधी बस सेवा सुरू होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही बस सेवा बंद करण्यात आली होती. आज तब्बल १३ वर्षांनी ही बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.
बुर्गी परिसरात बुर्गी, मरकल, मरकल टोला, कांदोळी, अब्बनपल्ली, करपनफुंडी, गुंडापुरी सह इतर गावातील नागरिक एटापल्ली येथे दररोज शासकीय कामासाठी, बाजारासाठी व खाजगी कामासाठी जाणे येणे करतात. मात्र आजपर्यंत बस सेवा नसल्या कारणाने त्यांना पायदळ किंवा सायकलने १५ किमी चे अंतर कापून तालुका मुख्यालयी जावे लागत होते. तसेच बुर्गी येथिल शाळकरी विद्यार्थी ही पायदळ येत होते. बुर्गी येथील पोलीस मदत केंद्र असल्याने तेथील कर्मचार्यांना ही याचा त्रास होत होता मात्र आज पासून बस सेवा सुरू झाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.