Nagpur Rain: नागपुरात २ तासांत ‘अति’रेकी वृष्टी! पुराने वेढले, लष्कर तैनात; NDRF, SDRF रेस्क्यू कार्यात

By मंगेश व्यवहारे | Published: September 23, 2023 01:02 PM2023-09-23T13:02:41+5:302023-09-23T13:09:56+5:30

सखल भागातील १४० नागरीकांना एनडीआरएफ, एसडीआरएफने रेस्क्यू केले होते.

After 90 mm of rain fell in just two hours, Nagpur city was engulfed in floods. | Nagpur Rain: नागपुरात २ तासांत ‘अति’रेकी वृष्टी! पुराने वेढले, लष्कर तैनात; NDRF, SDRF रेस्क्यू कार्यात

Nagpur Rain: नागपुरात २ तासांत ‘अति’रेकी वृष्टी! पुराने वेढले, लष्कर तैनात; NDRF, SDRF रेस्क्यू कार्यात

googlenewsNext

नागपूर : मध्यरात्री २ वाजतापासून वीजांच्या कड़कडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अवघ्या दोन तासात ९० मिमी पाऊस कोसळल्याने नागपूर शहराला पुराने वेढा घातला. शहरातील नदीनाले ओव्हरफ्लो झाले. वस्त्यांमध्ये पाणी शिरले, प्रशासनाची झोपमोड झाली. एनडीआरएफ, एसडीआरएफ बरोबरच लष्करांच्या तुकड्यांनाही रेस्क्यू करण्यासाठी प्रशासनाने पाचारण केले. सखल भागातील १४० नागरीकांना एनडीआरएफ, एसडीआरएफने रेस्क्यू केले होते.

पंचशील चोक केअर हॉस्पिटलच्या मागे वंदना अपार्टमेंट जवळ कार वाहून जात होती. कारमध्ये असलेल्या व्यक्तीला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले.- मुक-बधीर विद्यालयातील ४१ विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पार्वताबाई साखरे यांना समतानगर नाल्याच्या बाजूला असलेल्या झोपड्यातून सुखरूप काढण्यात आले. मोरभवन बसस्टॅण्ड परिसरातून १४ लोकांना रेस्क्यू करण्यात आले. मातंगपुरा येथून एका कुटुंबाला रेस्क्यू करण्यात आले. कुंभारपुरा जुना बगडगंज येथील धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. एलएडी कॉलेज हॉस्टेलच्या ५० विद्यार्थिनी यांना रेस्क्यू करण्यात आले.वर्मा लेआऊट आणि समता लेआऊटचे २४ नागरीक सुखरूप बाहेर काढण्यात आले.पंचशील चौक येथून ११ प्रवासी सुखरूप बाहेर काढले.

नुकसान

हजारीपहाड (सह्याद्री) भागात गोठ्यात बांधलेली बारा जनावरे मृत झाली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. रामगिरी झोपडपट्टी, सिव्हिललाईन्स येथे भिंत पडल्याने ४ घरे पडली. झाशी राणी चौक ते पंचशील चौकातील सोया मिल्क प्लॅण्ट जवळील पूलाची भिंत कोसळली, रस्ताही गेला वाहून.

सकाळी ८.३० पर्यंत ११६. ५ मिमी पाऊस

मध्यरात्री २ वाजतापासून सुरू झालेला पाऊस पहिल्या दोन तासांमध्ये ९० मिमी बरसला. तर हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी ची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे गोरेवाड्याचे २ गेट उघडण्यात आले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी रस्त्यावर

मुसळधार पावसामुळे शहरातील परिस्थितीचा आढावा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रस्त्यावर उतरून घेतला. त्यांनी मनपा मुख्यालयातील अटल बिहारी सिटी ऑपरेशन सेंटरमधूनही शहरातील पुर परिस्थिती जाणून घेतली.

Web Title: After 90 mm of rain fell in just two hours, Nagpur city was engulfed in floods.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.