कारवाईनंतरही नियम पायदळी

By admin | Published: October 26, 2014 12:15 AM2014-10-26T00:15:33+5:302014-10-26T00:15:33+5:30

चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही.

After the action, | कारवाईनंतरही नियम पायदळी

कारवाईनंतरही नियम पायदळी

Next

वाहतूक सिग्नल तोडण्याची संख्या वाढली : पोलीस असतील तरच नियम पाळायचा!
नागपूर : चौकात वाहतूक पोलीस असतील तरच नियम पाळायचा नाहीतर तोडायचा ही प्रवृत्ती शहरात वाढत आहे. शहरातील मोजकेच चौक सोडल्यास इतर चौकात वाहतूक पोलीसच राहत नाही. यामुळे बहुसंख्य चौकांमध्ये वाहनचालक सामूहिकपणे सर्रास सिग्नल तोडतात. ज्या चौकाच्या एका कोपऱ्यात सावलीत पोलीस उभे असतात तो मार्ग सोडल्यास इतर मार्गावरील लाल दिव्यात वाहन दामटतात. वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या संख्येमुळे सामूहिकपणे सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
आजच्या धावपळीच्या काळात सिग्नलवर लाल दिवा लागल्यावर काही सेकंद थांबण्याची तसदी अनेक वाहनचालक घेत नाहीत. अशा सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नियमानुसार दंड आकारण्यात येतो. अनेकवेळा थेट सिग्नल तोडून वाहनचालक निघून जातात, चौकांमध्ये एका कोपऱ्यात उभे असलेले वाहतूक पोलीस त्याकडे केवळ पाहत राहतात.
एवढ्या दुरून त्यांना त्याच्या वाहनाची नंबरप्लेटही दिसून येत नाही. यातच सिग्नल तोडलेल्याची माहिती पुढील चौकातील पोलिसांनाही दिली जात नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
यांना कोण रोखणार?
एखादा वाहनचालक सिग्नल तोडत असेल, तर वाहतूक पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, मात्र शहरातील काही चौकांमध्ये सिग्नल लागल्यावरही वाहनचालक थांबण्याकडे दुर्लक्ष करीत वाहन पुढे नेतात. वाहतूक पोलीस थांबण्याची सूचना देतात, मात्र वाहनचालक त्याकडे कानाडोळा करीत भरधाव वेगात निघून जातात. एकाचवेळी अनेक वाहने सिग्नल तोडत असल्याने चौकातील वाहतूक पोलीस हतबल ठरतात.
या चौकांमध्ये
नियम तुटतात
पंचशील चौक, लोकमत चौक, लक्ष्मीनगर चौक, दीक्षाभूमी चौक, प्रतापनगर चौक, सरदार वल्लभभाई पटेल चौक, बैद्यनाथ चौक, जगनाडे चौक, गंगाबाई घाट चौक, रेशीमबाग चौक, गोळीबार चौक, कमाल चौक, इंदोरा चौक, गीतांजली टॉकीज चौक, अलंकार टॉकीज चौक, ट्राफिक पार्क चौक, भोले पेट्रोल पंप चौक, काटोल रोड चौक, महाराजबाग चौक, अवस्थीनगर चौक, मानकापूर चौक, पत्रकार सहनिवास चौक, नंदनवन चौक, उत्थाननगर चौक आदी चौकांमध्ये हमखास नियम तुटताना दिसून येते.
१०० ते २०० रुपये दंड
सिग्नल तोडणे या गुन्ह्यासाठी वाहनचालकास १०० रुपये दंडाची शिक्षा आहे.
तसेच सिग्नल तोडणारा वाहनचालक इशारा देऊनही थांबला नाही तर त्याच्याकडून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.
मात्र वाहतूक पोलिसांना एकाच वेळी सिग्नल तोडणाऱ्यांना रोखता येत नसल्याने अशाप्रकारे सिग्नल तोडणाऱ्यांची हिंमत वाढत आहे. यासाठी कठोर कारवाईची मागणी आहे.(प्रतिनिधी)

Web Title: After the action,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.