महात्मा गांधीनंतर शेतकऱ्यांचे लोकनेते ठरले शरद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:03 AM2018-05-30T00:03:52+5:302018-05-30T00:04:14+5:30

स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

After Mahatma Gandhi, Sharad Joshi became the leader of the farmers | महात्मा गांधीनंतर शेतकऱ्यांचे लोकनेते ठरले शरद जोशी

महात्मा गांधीनंतर शेतकऱ्यांचे लोकनेते ठरले शरद जोशी

Next
ठळक मुद्दे‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ पुस्तक प्रकाशनात मान्यवरांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
हिंदी मोर भवनच्या अर्पण सभागृहात शेतकरी संघटनेच्यावतीने ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी झाले. प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते. तसेच विदर्भवादी व शेतकरी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पुस्तकाचे लेखक भानु काळे, शेतकरी संघटन ट्रस्टचे रविभाऊ काशीकर, राम नेवले उपस्थित होते. यावेळी बोलताना रविभाऊ काशीकर म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या मध्ये पडू नये. शेतकऱ्यांनी काय पिकवावे, काय पिकवू नये हे सरकारने सांगू नये. शरद जोशींनी आम्हा शेतकऱ्यांना चांगले शिकविले आहे. त्यामुळेच मला गांधींच्या आंदोलनात सहभागी होऊ न शकल्याची खंत होती. पण शरद जोशी यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आनंद आहे. यावेळी शैलजा देशपांडे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या महिलांना आंदोलनात नेतृत्व करण्याची संधी शरद जोशी यांनी दिली. महात्मा गांधीनंतर शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली चळवळ ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी होती. प्रसंगी अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी हे शेतकऱ्यांसाठी प्रवाहाविरुद्ध लढले, त्यामुळे ते लोकनेते ठरले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले की, शरद जोशींनी जे आंदोलन उभारले होते त्याची राजकारण्यांमध्ये धास्ती होती. देशातील राजकारण व अर्थकारणाला वळण देण्याचे काम जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले. आभार मदन कांबळे यांनी मानले.

Web Title: After Mahatma Gandhi, Sharad Joshi became the leader of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.