वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदारास बिल मागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:37 AM2019-12-25T00:37:09+5:302019-12-25T00:38:42+5:30

सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.

After purchasing the item, ask the shopkeeper for a bill | वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदारास बिल मागा 

वस्तू विकत घेतल्यानंतर दुकानदारास बिल मागा 

Next
ठळक मुद्देग्राहक कल्याण समितीतर्फे जनजागृती

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : सेवा घ्या किंवा कुठल्याही दुकानातून वस्तू विकत घ्या, मात्र ती वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानंतर दुकानदाराला बिल मागा, असे सांगत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे मंगळवारी संविधान चौक व उद्योग भवनजवळ फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.
खाद्यपदार्थ घेताना एगमार्क चिन्ह पहा, सोने विकत घेताना हॉलमार्क पहा, वस्तू खरेदी करताना उत्पादकाचे नाव, शुद्ध वजन, कस्टमर केअर नंबर, एमआरपी पहा, कोणत्याही वस्तूची खरेदी ही एमआरपीपेक्षा जास्त किंमत देऊन करू नका, फसव्या जाहिरातीपासून नेहमी सावध राहा, असे आवाहन करण्यात आले. वृत्तपत्रामध्ये बांधलेले खाद्यपदार्थ आरोग्यास धोकादायक असल्याचे आवाहन ग्राहक कल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष अटलोए यांनी केले. जनजागृती रॅलीमध्ये ग्राहकांना कोणते अधिकार प्राप्त आहे तसेच ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी कुठे फोन करावा, याबद्दल माहिती देण्यात आली.
याप्रसंगी नीलेश नागोलकर, शेखर कोलते, शीलदेव दोडके, अशोक गाडेकर, अखिल पवार, राजू वाघ, कपिल खंडेलवाल, अजित शहा, अरविंद महर्षी, मिलिंद दहिवले, गुंजन रट्टे, सुशील मोरया, चंद्रकांत घोडेस्वार तसेच अन्न व औषध विभाग आणि वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विधानसभा आ. देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांनी ग्राहक कल्याण समितीस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: After purchasing the item, ask the shopkeeper for a bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.