चेहऱ्याच्या ‘स्कॅनिंग’नंतरच मिळणार प्रश्नपत्रिका

By admin | Published: March 16, 2016 08:39 AM2016-03-16T08:39:51+5:302016-03-16T08:39:51+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षा प्रणालीत जास्तीत जास्त

After scratch 'Scanning' question papers | चेहऱ्याच्या ‘स्कॅनिंग’नंतरच मिळणार प्रश्नपत्रिका

चेहऱ्याच्या ‘स्कॅनिंग’नंतरच मिळणार प्रश्नपत्रिका

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना सुरुवात झाली आहे. परीक्षा प्रणालीत जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या अग्रवाल समितीच्या शिफारशींनुसार यंदापासून प्रश्नपत्रिकांची ‘ई-डिलिव्हरी’ करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी शाखेच्या पेपरपासून ही सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरक्षित रहावी यासाठी परीक्षा केंद्रावरील जबाबदारी अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे संगणकाने ‘स्कॅनिंग’ केल्यानंतरच प्रश्नपत्रिका मिळू शकणार आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा व जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरीता राज्य शासनाने राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींनुसार ‘आयटी रिफॉर्म्स’ साठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू झाले. परीक्षा प्रणालीला ‘आॅनलाईन’ स्वरूप आले असून परीक्षा अर्ज भरणे, निकाल लावणे, मूल्यांकन इत्यादी गोष्टी ‘आॅनस्क्रीन’ व ‘आॅनलाईन’ करण्यात येत आहे. त्याहून समोर जात आता प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर ‘आॅनलाईन’ पद्धतीने पोहोचविण्यात येणार आहेत.
परीक्षेच्या दोन तासांआधी महाविद्यालयाच्या त्यांच्या ‘लॉगिंन आयडी’वर प्रश्नपत्रिका मिळणार आहे. परीक्षा केंद्रावरील जबाबदार अधिकाऱ्याच्या ‘ई-मेल’वर ४८ तासांअगोदर परीक्षेबाबत माहिती देणारी माहिती पाठविण्यात येईल. प्रत्यक्षात ज्या दिवशी पेपर असेल तेव्हा सकाळी ७.३० वाजता ‘लॉगिन आयडी’ व ‘पासवर्ड’ देण्यात येतील. हा ‘पासवर्ड’ प्रत्येक वेळी वेगवेगळा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे ‘स्कॅनिंग’ होऊनच ‘अकाऊंट’ उघडू शकेल. सकाळी ८.३० वाजता महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका मिळेल.(प्रतिनिधी)

आपात्कालीन आराखडादेखील तयार
संबंधित प्रणाली ही अतिशय सुरक्षित असून पेपर फुटण्याची कुठेही शक्यता नाही. समजा परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकारी काही आकस्मिक कारणांमुळे पेपरच्या दिवशी पोहोचू शकला नाही तर काय करायचे याबाबत विद्यापीठाकडून आपात्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत पेपर वेळेतच सुरू होतील. आपात्कालीन परिस्थितीमध्येदेखील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचतील याची विद्यापीठ हमी देत आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.

Web Title: After scratch 'Scanning' question papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.