प्रतिमा मलिन होताच आली जाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:24 AM2018-08-30T01:24:15+5:302018-08-30T01:25:30+5:30

एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे तर गेल्या दोन वर्षात इंदूर ‘टॉप टेन’ शहरात अव्वल आहे. दुसरीकडे नागपूर मॉडेल माघारले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत माघारल्यानंतर महापालिकेतील सत्तापक्षाची झोप उघडली. इंदूर शहराने घेतलेल्या भरारीचा अभ्यास करण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंदूरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पोहचले व बुधवारी दुपारी शिष्टमंडळ परतले.

After tarnishing image Awake! | प्रतिमा मलिन होताच आली जाग !

प्रतिमा मलिन होताच आली जाग !

Next
ठळक मुद्देस्थायी समिती व आरोग्य समितीच्या सदस्यांचा इंदूर अभ्यास दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी नागपूर शहर रस्ते, स्वच्छता व हिरवळीच्या बाबतीत देशभरातील ‘टॉप टेन’ शहरात होते. इंदूरचे शिष्टमंडळ नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. नागपूर मॉडेलची देशभरात चर्चा होती. आज परिस्थिती बदलली आहे. नागपूर स्वच्छतेच्या बाबतीत ५५ व्या क्रमांकावर आहे तर गेल्या दोन वर्षात इंदूर ‘टॉप टेन’ शहरात अव्वल आहे. दुसरीकडे नागपूर मॉडेल माघारले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत माघारल्यानंतर महापालिकेतील सत्तापक्षाची झोप उघडली. इंदूर शहराने घेतलेल्या भरारीचा अभ्यास करण्यासाठी मंगळवारी स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंदूरच्या अभ्यास दौऱ्यासाठी पोहचले व बुधवारी दुपारी शिष्टमंडळ परतले.
अभ्यास दौऱ्यात आरोग्य सभापती मनोज चापले, अपर आयुक्त अजीज शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, स्वास्थ्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, सुवर्णा दखने, विभागीय अधिकारी दीनदयाल टेंभेकर, रामभाऊ तिडके यांच्यासह स्थायी समिती व आरोग्य समितीच्या सदस्यांचा समावेश होता.

इंदूरमध्ये काय बघितले ?
अभ्यास दौऱ्यात शिष्टमंडळातील सदस्यांनी स्वच्छतेबाबत माहिती घेतली. इंदूर शहरातील नागरिक स्वच्छतेबाबत कमालीचे जागरूक आहेत. शहरातील प्रत्येक घरातील कचरा विलग होऊनच बाहेर पडतो.शहराती संपूर्ण कचºयाचे संकलन आणि वाहतूक महापालिके मार्फत करण्यात येते. इंदूर महापालिकेत १९ झोन असून ८५ वॉर्ड आहेत. ६०० कचरा गाड्या कचरा संकलन करतात. ८५ वॉर्डमध्ये प्रत्येकी एक मोठे वाहन देण्यात आले आहे. शहरात कचरा संकलनासाठी १० ट्रान्सपोर्ट स्टेशन आहे. घराघरांतून संकलित केलेला कचरा या ट्रान्सपोर्ट स्टेशनवर छोट्या कचरागाड्यांद्वारे आणण्यात येतो. तेथून तो डम्पिंग यार्डला पाठविला जातो. डम्पिंग यार्डमध्ये संपूर्ण कचऱ्यांवर प्रक्रिया केली जाते.

Web Title: After tarnishing image Awake!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.